प्रतिष्ठा न्यूज

तासगाव अंनिस कडून शालेय विद्यार्थ्यांना सत्यशोधक चित्रपट पाहण्याचे आवाहन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनावरील चित्रपट “सत्यशोधक” नुकताच प्रदर्शित झाला असून तासगाव मधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी महात्मा फुले यांच्या एकुण जीवन प्रवास आणि त्यांचे कार्य अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तो प्रत्यक्ष पाहीला.चित्रपट अतिशय सुंदर पध्दतीने तयार करण्यात आलेला असून तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून काही करता येईल का याचा विचार करून अंनिसच्या कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात चित्रपट पाहता येईल अशी व्यवस्था केली आहे.याच संदर्भात तासगाव मधील स्वामी रामानंद भारती विद्यामंदिर येथे मुलांना आवाहन करण्यात आले.यावेळी प्रा डॉ बाबुराव गुरव यांनी मुलांना सावित्रीबाई फुले आणि जोतिबा फुले यांच्या कार्याची माहिती मुलांना दिली.भारती शाळेचे प्राचार्य पाटील सरांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात “सत्यशोधक”चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.यावेळी तासगाव अंनिस कार्याध्यक्ष अमर खोत,कार्यकर्ते केतन माने,सलमान अन्सारी आणि शिक्षक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.