प्रतिष्ठा न्यूज

तासगावात जुन्या पेन्शनसाठी बेमुदत संप

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : जुनी पेन्शन योजना तात्काळ लागू करा,नगरपरिषद, नगरपंचायत राज्य संवर्ध अधिकारी व नगरपरिषद,नगरपंचायतच्या आस्थापना वरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यावर तातडीने कार्यवाही करा, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या वतीने २९ आगस्टपासून बेमुदत संप सुरु आहे.गुरुवारपासून तासगाव नगरपरिषद अधिकारी-कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरु केला.महाराष्ट्र शासन अंतर्गत नगरपरिषद,नगरपंचायत राज्य संवर्गातील ३ हजार अधिकारी व स्थानिकचे ६० हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही.तसेच जुनी पेन्शन योजना लागू करा यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटनेने २९ ऑगस्ट पासून काम बंद ठेवत बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.