प्रतिष्ठा न्यूज

केंब्रिज अकॅडमी च्या विद्यार्थ्यांचा पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते सत्कार

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी :  केंब्रिज नारायणा आयआयटी मेडिकल अकॅडमी मधील शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे गुलाबराव पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देवुन अभिनंदन व सत्कार करणेत आले
यामध्ये अनुराधा पाटील ही इ. १२ वी (HSC) परिक्षेत कॉलेज मध्ये प्रथम आली, क्षितीज पाटील हा  NEET मध्ये चांगल्या गुणांनी अव्वल आला, सुजल पाटील याने MH CET परीक्षेत दैदिप्यमान यश मिळविले,
याप्रसंगी पृथ्वीराज पाटील यांनी अकॅडमीचे शिक्षक, प्रशासन व्यवस्था यांनी सुद्धा मेहनत घेऊन संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे असे गौरवउद्गार काढले.
सांगली, मिरज परिसरातील अत्यंत चांगली शैक्षणिक आणि वसतिगृह व्यवस्था असणारी ही एकमेव संस्था आहे. मुलांच्या हितासाठी संस्थेने मोठे काम केले आहे. शैक्षणिक संस्थेमध्ये अग्रेसर अशी गुलाबराव पाटील शिक्षण संस्था आहे.
अकॅडमीचे डायरेक्टर प्रा. हरिकृष्णा सर, अकॅडमीचे प्रशासक प्रा. रफिक तांबोळी सर, आदिनारायण सर, देव राव सर, रोहित यादव सर, स्मिता कुंभार मॅडम, रामेश्वरी नांद्रेकर मॅडम या सर्वांचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभल्यामुळेच हे यश मिळालेले आहे अशा शब्दात पृथ्वीराज पाटील यांनी कौतुक आणि अभिनंदन केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.