प्रतिष्ठा न्यूज

सांगलीत लायन्स नॅब हॉस्पिटलच सांडपाण्यात

प्रतिष्ठा न्यूज/ योगेश रोकडे
सांगली : येथील प्रभाग क्रमांक ११ येथील लायन्स नॅब हे धर्मादाय हॉस्पिटलच्या आवारात चक्क सांडपाणी साचले असून येथे डास व इतर उपद्रवी कीटकांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. सदर हॉस्पिटलमध्ये अनेक गोरगरीब रुग्णांचे डोळ्यांचे उपचार केले जातात व येथील भोजनालयासमोरच सांडपाणी तुडुंब भरले आहे. याची फिकीर ना हॉस्पिटल प्रशासनाला आहे ना महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर यांना त्याची काळजी आहे.
आम आदमी पार्टीकडे जेव्हा येथील नागरिकांनी तक्रार केली तेव्हा सांगली जिल्हा शहर समितीचे संघटक श्री. फय्याज सय्यद ख्वाजा जमादार, राम कोकरे व इमरान पठाण यांनी तात्काळ याची दखल घेऊन सदर परिसरास भेट दिली असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. मागे याच प्रभागात तब्बल २१ डेंगूचे रुग्ण आढळून आले होते तरी देखील महापालिकेने हा इकडे लक्ष दिले नसल्याबाबत स्थानिक नागरिकात रोष निर्माण झाला आहे. येथील सांडपाण्यात प्रचंड प्रमाणात डास व इतर उपद्रवी कीटक यांची रेचचेल झाली आहे व उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांच्या देखील आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी जर याची लवकर दखल घेऊन जर योग्य बंदोबस्त केला नाही तर पावसाळ्यात पाणी साचून येथे तळे निर्माण होईल अशी भीती फय्याज सय्यद यांनी व्यक्त केली आहे. तसेच महापालिकेच्या मेडिकल ऑफिसर व आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई न केलेस आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.