प्रतिष्ठा न्यूज

तासगावच्या साधना दिव्यांग मतिमंद विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा…पोलीस उपनिरीक्षक तारडे साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहन

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन सोहळा आधार शिक्षण संस्था संचलित,साधना दिव्यांग मतिमंद विद्यालयाच्या प्रांगणामध्ये साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी तासगाव पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक मा.नामदेव तारडे,बेदाणा व्यापारी व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघ सचिन शेटे,शाळा समिती सदस्य चक्रपाणी दौंड,आधार शिक्षण संस्थेचे खजिनदार सतीश देवकारे सर,आधार शिक्षण संस्थेचे सदस्य धनाजी (तात्या) पाटील,शाळा समितीचे सदस्य मनोज (नाना) शिंदे, बाळासाहेब (तात्या )माळी,दादासाहेब (भाऊ) गावडे,शुभम थोरबोले,सौ. रंजना गावडे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक नामदेव तारडे साहेब यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी चक्रपाणी  दौंड यांनी मनोगत व्यक्त केले.नामदेव तारडे  साहेब यांनीहि आपले मनोगत व्यक्त केले.सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊवाटप करण्यात आले.तारडे साहेब यांच्या हस्ते श्री सचिन शेटे यांची शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.श्री.कालगावकर दादा यांच्याकडून प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्र संचलन अनिल राजमाने सर यांनी केले.पाहुण्यांचे आभार हाटकर मॅडम यांनी मानले.संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन संस्था सचिव श्री संजय राजमाने सर यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.