प्रतिष्ठा न्यूज

अतिवृष्टीमुळे घरांची पडझड होऊन बावीस लाखांचे नुकसान

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा ता. ३१ : गगनबावडा तालुक्यात वादळी वारे व अतिवृष्टीमुळे आठ दिवसात ६२ घरे व ९ जनावरांच्या गोठ्यांची अंशतः पडझड होऊन २१ लाख६५ हजारांची हानी झाली आहे. हाही जिल्ह्यात विक्रमच असेल.
दोन दिवसांमध्ये पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने जोर धरल्यामुळे १३ राहती घरे व एका जनावरांच्या गोठ्यांची अंशतः पडझड होऊन चार लाखांचे नुकसान झाले आहे. यामध्ये मंदूर,तिसंगी, मुटकेश्वर येथील तीन, तर तळये बुद्रुक, लोंघे , खडूळे, साखरी व सैतवडे येथील एका घरांचा समावेश आहे. तहसीलदार यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

“कुंभी नदीकाठची ऊस पिके गेले आठ-दहा दिवस पूर्णतः पाण्यात आहेत. आणखी तीन -चार दिवस पाण्यात राहिल्यास ऊस पिक व भात पिके पूर्णतः वाया जाणार आहेत. त्यामुळे घेतलेली कर्जे फेडायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकांचे पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळावी.”
राजेश पाटील, मा. सरपंच, सांगशी
विलास पडवळ, मा.ता.शिवसेनाप्रमुख
विजय वरेकर, मा. सरपंच,
संजय वरेकर, पो.पाटील, सैतवडे

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.