प्रतिष्ठा न्यूज

बावेलीत किलचा पदभ्रमंतीने शिवकालीन इतिहासाला उजाळा छत्रपती परिवार व गावगाड्याच्यावतीने पदभ्रमंतीचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : गगनबावड्याचा धो धो कोसळणारा पाऊस, चिखलवाटा तुडवत,दरीखोरीतून छत्रपतीचा जयघोष, हर हर महादेवचा गजर, शिवप्रेमीनी बावेलीतील इतिहासाच्या पाऊल खुणांना उजाळा दिला. या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेत सुमारे दोनशे युवक युवतींचा समावेश होता.गावगाडा फाउंडेशन ,ग्रामस्थ बावेली व कोल्हापूर येथील राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
गडकोट संवर्धनाचे काम करणाऱ्या शिवछत्रपती परिवाराचे स्वागत करून महिमेस सुरुवात झाली. धुंदवडे शाळेच्या रणरागिनी पथकाने मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक दाखवले. शिवपूर्वकाळातील जकातीचा नाका असलेला ,स्वराज्याला रसद पुरवणारा किलचा परिसराची व तेथील खिंड लढवणारे सरदार बाबजी काटे यांच्या पराक्रमाची माहिती इतिहास संशोधक विनायक सणगर यांनी दिली. शेकडो वर्षाच्या इतिहासात पुन्हा ऐतिहासिक किलच्यावर भगवे निशाण फडकवण्यात आले.भुयारी मार्ग, भाला,बरची, जकातीच्या मोहरा, शिक्के ,कट्यार, शंख पाहण्यास मिळाले.काटे घराण्याच्या वंशाजांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
मोहीम यशस्वी करण्यासाठी गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य ,गावगाडा फाउंडेशनचे युवक-युवती , शिवछत्रपती परिवार यांनी परिश्रम घेतले.

पर्यटन विकासासाठी टर्निंग पॉईंट ठरणारी मोहीम
बावेली किलच्यावरील ऐतिहासिक मोहीम ही गगनबावडा तालुक्याच्या पर्यटन विकासाला टर्निंग पॉईंट ठरणारी आहे.यामुळे पर्यटन क्षेत्राच्या विकासाबरोबरच स्थानिकांना व्यवसाय मिळेल.
– विनायक सनगर
इतिहास संशोधक,मोडी लिपी तज्ञ

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.