प्रतिष्ठा न्यूज

संविधान दिनी सांगलीत बाईक रॅलीचे आयोजन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 24 : संविधान दिन म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस साजरा करण्यात येतो. या निमित्त दि. 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता सांगली शहरामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात येणार आहे व त्यानंतर बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त जयंत चाचरकर यांनी दिली.
बाईक रॅलीचा मार्ग हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक, एस.टी. स्टँड मार्गापासून – छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा – महानगरपालिका इमारत मार्ग – सिटी पोस्ट ऑफिस मार्गे स्टेशन चौक – राममंदिर मार्गे – पुष्पराज चौक असा आहे. या दिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन, संविधान उद्देशिकेचे वाचन तसेच बाईक रॅलीकरिता सांगली जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी तसेच सर्व नागरिकांनी वेळेत सांगली एस. टी. स्टँड परिसरातील, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या ठिकाणी दुचाकीसह उपस्थित राहण्याचे आवाहन श्री. चाचरकर यांनी केले आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.