प्रतिष्ठा न्यूज

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त सांगली जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली दि. 19 : छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन करण्यात आले. शिवाजी मंडई सांगली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

या कार्यक्रम प्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधिक्षक संदीप घुगे, महानगरपालिका आयुक्त सुनील पवार, माजी आमदार दिनकर पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, अप्पर पोलीस अधिक्षक रितू खोखर यांच्यासह शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मान्यवर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनीही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रारंभी राज्यगीत वादन करण्यात आले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.