प्रतिष्ठा न्यूज

नाटक कसं होतं तेच बघतो ; शिवपुत्र संभाजी महानाट्य बंद पाडण्याची चक्क पोलिसांकडून धमकी ; अमोल कोल्हे यांनी प्रेक्षकांसमोर दिली माहिती

पुणे ता.१४ : लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादी पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याची सध्या सगळीकडे चर्चा आहे. ना नाटकाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभतो आहे. मात्र पिंपरी- चिंचवड येथे सुरू असलेल्या नाटकाच्या प्रयोगा दरम्यान त्यांना वेगळा अनुभव आला आहे. पिंपरी- चिंचवड येथील काही पोलिसांकडूनच हे महानाट्य बंद पाडण्याची धमकी देण्यात आली आहे. कार्यक्रमाचे फुकट पास दिले नाहीत तर हे नाटक कसं होतं तेच बघतो, अशी धमकी नाटकाच्या आयोजकाला देण्यात आल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं. कार्यक्रम संपल्यावर अमोल कोल्हे यांनी सगळ्यांसमोर हा प्रकार सांगितला. पिंपरी- चिंचवड शहरातील एच ए ग्राउंडवर सुरू असलेलं हे नाटक फुकट पाहता यावं यासाठी पोलिसांनी फ्री पासची मागणी केली. मात्र नकार देताच नाटक बंद पाडण्याची धमकी दिली.
अमोल यांनी नाटकाच्या व्यासपीठावरूनच हा प्रकार उघड केला सोबतच गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेत चौकशी करावी अशी मागणी केली. व्यासपीठावर हा प्रकार सांगत अमोल कोल्हे म्हणाले, ‘यापूर्वी संभाजीनगर, कोल्हापूर, निपाणी या ठिकाणी जेव्हा प्रयोग झाले त्यावेळी पोलिसांनी खूप मोठे सहकार्य केले नाशिकमध्ये तर पोलीस आयुक्तांनी अडीच हजार पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटुंबीयांसह तिकीट काढून हा प्रयोग दाखवला. मात्र पिंपरी चिंचवडमध्ये आज अतिशय खेदजनक अनुभव आला आहे.
शिवपुत्र संभाजी नाटकाच्या प्रयोगाची फुकट तिकीटे मिळाली नाही म्हणून हा प्रयोग कसा होतो हेच पाहतो, अशी धमकी एका पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. माझा विरोध हा व्यक्तीला नसून अशा प्रकारे फ्री पास मागणाऱ्या प्रवृत्तीला आहे.’

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.