प्रतिष्ठा न्यूज

तासगावसह तालुक्यातील अवैध धंद्यावर कारवाई करा : युवानेते प्रभाकर पाटील

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव:तासगाव शहर व तालुक्यातील सुरू असलेल्या विनापरवाना कॅफेवर कारवाई करावी त्याच बरोबर तालुक्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांवर तसेच दहशत माजवणाऱ्या फाळकुट दादांवर कडक कारवाई करावी,अशी मागणी प्रभाकर पाटील यांनी तासगावचे पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्याकडे केली.तासगाव कवठे महांकाळ भाजपाचे प्रमुख प्रभाकर पाटील यांनी तासगाव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची भेट घेतली.यावेळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तासगाव शहर व तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चर्चा केली.यावेळी तासगाव शहर व तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.सांगली येथे कॅफेमध्ये घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रभाकर पाटील हे ऍक्टिव्ह झाले असून प्रभाकर पाटील यांनी पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची तातडीने भेट घेत अशा गोष्टी घडत असतील तर त्यावर वेळीच कारवाईची मागणी केली.तसेच कोणत्याही राजकीय पक्षाचा पदाधिकारी अथवा कार्यकर्ता असेल व तो कायद्याचे पालन करत नसेल तर त्याच्यावर ही कारवाई व्हावी अशी मागणी केली.यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले,तासगाव शहरासह तालुक्यातील हॉटेल्स,कॅफे चालक यांची बैठक घ्यावी,बेकायदेशीर धंदे चालणार नाहीत अश्या सक्त सूचना द्याव्यात. यावेळी तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक वाघ व प्रभाकर पाटील यांच्यात चर्चा झाली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.