प्रतिष्ठा न्यूज

अशी पाखरे येती स्मृती ठेवून जाती या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे पुन्हा एकदा तब्बल 21 वर्षांनी एकत्र आली…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथील,”अशी पाखरे येती स्मृती ठेवून जाती” या स्मृतीला उजाळा देण्यासाठी ही पाखरे परत एकदा समृद्धी  मल्टीपर्पज हॉल मध्ये *मैत्रीचा स्नेहमेळावा* या शीर्षकाखाली माजी विद्यार्थी 1999 – 2002 बॅचचे विद्यार्थी एकत्रित आले.                    आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन लांडगे व विना खेराडकर यांनी अतिशय खुमासदार शैलीत सादर केले.              कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अनिल पाटील यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.प्रत्येक विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक अशा प्रमाणे गिफ्ट घेऊन आले होते ते सर्व एकत्रित करून लकी ड्रॉ पद्धतीने नंबर येईल त्याप्रमाणे गिफ्ट घेण्यासाठी समोर आल्यानंतर आपला परिचय करून देण्यात आला. सदर कार्यक्रम हा दोन सत्रात घेण्यात आला,दुपारच्या सत्रात ज्यांनी आपल्या क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचे नियोजन संदीप नागजे व विश्वास पाटील यांनी केले.त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला व स्नेहभोजनाच्या वेळेस संगीत मैफिलीचा कार्यक्रम पार पडला.                                            मैत्रीचा स्नेह मेळावा च्या निमित्ताने आज सर्वच क्षेत्रातील व्यावसायिक,शासकीय,निमशासकीय,खाजगी क्षेत्रातील तर कोणी आधुनिक शेतकरी क्षेत्रातील,तर कोणी संसार सांभाळून घरगुती कामामध्ये विशेष करून संसारामध्ये रमून गेलेल्या महिला स्वतःसाठी एक दिवस म्हणून सर्वच जण अगदी वेळ काढून कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहिले होते.कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यासाठी अनिल पाटील,अमोल विटेकर,सचिन शेटे,सचिन लांडगे,माणिक पांढरे, सचिन पाटील,विना खेराडकर,मनीषा पाटील,मीना पाटील,जयश्री चौगुले यांनी विशेष प्रयत्न केले. शेवटी आलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे तसेच सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गेले काही दिवस प्रयत्न करणाऱ्यांचे आभार जयश्री थोरबोले यांनी व्यक्त केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.