प्रतिष्ठा न्यूज

विरोध डावलून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले : प्रा गंगाधर बनबरे; सांगलीत शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक करून रयतेचा राजकारभार पाहू लागले. याचा अर्थ ते यापूर्वी राज्यकारभार पहात नव्हते असा होत नाही. ठराविक घटकांना न्याय देण्यासाठी राजांना राज्याभिषेक करणे गरजेचे होता. म्हणून त्यांनी तो केला. त्यावेळी अनेकांनी त्यांना विरोध केला. काही लोकांनी त्या काळामध्ये राज्यांकडून संपत्ती विविध मार्गाने मिळवली. ज्यांनी विरोध केला त्यांनीच ही संपत्ती मिळवली. छत्रपती शिवाजी महाराज अनेक राज्यापेक्षा खूप वेगळे होते. कारण कोणताच राजा छत्रपती झाला नव्हता. त्यांचा खरा इतिहास इंग्रजांच्या वकिलांनी डे टू डे मांडला आहे. अनेकांनी चुकीचा इतिहास समोर आणला. राजांच्या मातापित्यावरूनच फक्त वाद उकरून काढला नाही. पण अनेकांनी अनेक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. छत्रपतींचे महत्त्व कमी करण्यासाठी काही लोक सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र ते कदापि साध्य होणार नाही. छत्रपती यांचे मॅनेजमेंट त्या काळात ही खूप आदर्शवत होते. त्यांनी कधीही माणसाची देवाणघेवा विक्री त्यांच्या काळात केली नाही. त्याला परवानगी दिली नाही. अलीकडचे लोक मात्र हजार पाच हजार रुपये घेऊन मतासाठी स्वतःला विकले जात आहेत. अशी खंत यावेळी बोलताना गंगाधर बनबरे यांनी व्यक्त केली. ते सांगली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५१ व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे आयोजन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले होते. यावेळी वकृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. रोख बक्षीस व ट्रॉफी देऊन मुलांचा सत्कार करण्यात आला .या स्पर्धा दोन गटांमध्ये संपन्न झाल्या. अनेक स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला. अत्यंत चांगल्या पद्धतीने उत्साही वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल मनोगत व्यक्त करण्यात आली. या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट
प्रथम क्रमांक साबिया मुजावर
द्वितीय क्रमांक दूर्वा माने
तृतीय क्रमांक ऋतुजा हजारे
मोठा गट
प्रथम क्रमांक पूजा साळुंखे
द्वितीय क्रमांक तनिष्का तोडकर
तृतीय क्रमांक इंद्रनील पाटील
या कार्यक्रमाला सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. यावेळी मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सचिन पवार,माजी अध्यक्ष जालिंदर महाडिक, उद्योजक कक्षाचे राजेंद्र पाटील, अमृत सूर्यवंशी, डॉ संजय पाटील, प्रणिता पवार,रेखा पाटील, तात्यासाहेब खोत, भारती पाटील, नितीन पवार ,शिवाजी जाधव, विजयमाला कदम, सुलोचना पवार ,हेमलता मदने, जितेंद्र भोसले, जयंत निरगुडे, श्रीकांत पाटील, राजकुमार पेडणेकर, रामहरी ठोंबरे ,राजाराम सावंत,संदीप पवार, राजेंद्र जाधव, शहाजीत पटवेगार, विशाल कोळी ,प्रकाश मालपाणी व संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन रेखा पाटील व आभार प्रणिती पवार यांनी केले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.