प्रतिष्ठा न्यूज

20 वर्षापासून विनावेतन शिक्षकांच्या आझाद मैदानावरील उपोषणाला मराठवाडा शिक्षक संघाचा जाहीर पाठिंबा

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
मुंबई दि.14 : गेल्या 20 ते 22 वर्षापासून राज्यात कायम विनाअनुदानित शाळा,ज्युनियर काॅलेज मध्ये शिक्षक बांधव,भगिनी शिक्षकाची नोकरी करीत आहेत. शासनाने सन 2009 मध्ये कायम शब्द वगळून विनाअनुदानित शाळा घोषित केल्या. तसेच या शाळा,महाविद्यालयांना अनुदान देण्यासाठी दोन ते तीन वेळेस तपासणी करण्यात आली. सदरील शाळा,काॅलेज 20%, 40%अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्यात आल्या. मात्र अद्यापही त्यांना वेतन मिळाले नाही. पुरोगामी, प्रगत नावलौकिक असलेल्या महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. आज शिक्षक विनावेतन, वेठबिगार म्हणून नोकरी,सेवा करीत आहे.तर अनेक कर्मचारी विनावेतन सेवानिवृत्त झाले आहेत. संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. शिक्षक आमदार,लोकप्रतिनिधी यांनी अनेकवेळा विधानसभेत या शिक्षकांना वेतन द्यावे म्हणून प्रश्न उपस्थित केला. मात्र शासनाने या कडे गांभीर्याने लक्ष केंद्रित केले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षक बांधव 100% वेतन मिळाले पाहिजे यासाठी बेमुदत साखळी उपोषण आझाद मैदान,मुंबई येथे सुरू केले आहे.गेल्या चार,पाच दिवसात एकही राजकीय पक्षाचा शिक्षक आमदार अथवा राजकीय शिक्षक संघटनेने पाठिंबा दिला नाही. परंतु राजकारण विरहित असलेला मराठवाडा शिक्षक संघ या संघटनेने जाहीर पाठिंबा दिला आहे.संघटनेचे नेते सूर्यकांत विश्वासराव स्वत: उपोषणाला बसले आहेत.
मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष माननीय मुख्याध्यापक श्री सूर्यकांत विश्वासराव यांनी आझाद मैदान, मुंबई येथील अघोषित बंधू भगिनींच्या महाआक्रोश आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवत पाठिंबा दिला. माननीय विश्वासराव सरांनी दिनांक 17 ऑक्टोबर पासून मराठवाडा शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह, सर्व शिक्षक वर्गासह आंदोलनात सामील होऊन, न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे, आंदोलनातून माघार न घेण्याचे व तोलामोलाची साथ देण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर आंदोलन कर्त्याचा मोठा भाऊ म्हणून अकरा हजार रुपयाची आर्थिक मदत केली. तसेच आपल्या मागण्या शिक्षणमंत्री,मुख्यमंत्री यांच्या पर्यंत पोहचवण्याचे वचन दिले.

 

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.