प्रतिष्ठा न्यूज

मौजे जाकापूर येथील कु.संगीता पवार हिची टपाल खात्यात नियुक्ती

प्रतिष्ठा न्यूज/ राजू पवार
नांदेड: मौजे जाकापूर ता.कंधार जि.नांदेड येथील रहिवासी कु.संगीता अंगदराव पवार हिची नुकतीच विदर्भातील तिरोरा जि.गोंदीया येथे  केंद्रीय पोस्ट ऑफिस,टपाल खात्यात नुकतीच ब्रेंच पोस्ट मास्तर ( बी.पी.एम.)या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तिचे 12 वी उच्च माध्यमिक शिक्षण.(विज्ञान) शाखेतील शिक्षण शांतिदूत गोविंदराव पाटील विद्यालय,गोणार या  शाळेत झाले  असून; माध्यमिक शिक्षण  शालांत परिक्षा जिल्हा परिषद गर्ल्स,हायस्कूल,मुखेड या शाळेत  इयत्ता 10 वी मध्ये 95 टक्के गुण घेऊन यश  मिळाले होते.
           कु.संगीता पवार हिची टपाल खात्यात नियुक्ती करण्यात आल्याने तिचे जिल्हाभरातून  अभिनंदन करण्यात येत आहे.
     दरम्यान तिला  तिचे आजोबा सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री हणमंतराव पवार गुरुजी,आजी माजी उपसरपंच रूक्मिणीबाई पवार, आई,वडील,काका,काकी आणि मार्गदर्शक शिक्षक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क,नांदेड कडून हार्दिक हार्दिक  अभिनंदन. शुभेच्छा.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.