प्रतिष्ठा न्यूज

तासगाव आनंदसागर पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची तक्रार निवारण समिती स्थापन करून अहवाल सादर करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव येथील आनंदसागर पब्लिक स्कुल अँड ज्युनिअर कॉलेजच्या मॅनेजमेंट कडून विध्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरु असून,या शाळेतील विद्यार्थ्यांचा प्रवास हा इन्शुरन्स संपलेल्या व पूर्वीचे गुन्हे दाखल असलेल्या ब्लॅक लिस्टेड तसेच पासिंग नसलेल्या स्कुल बसमधून केला जात आहे.काही दिवसापूर्वी शाळेच्या बसचा अपघात होऊन तुरची येथील किरण साळुंखे या युवकाचा मृत्यू झाला आहे.त्यावेळी संबंधित बस मध्ये 20 ते 22 विद्यार्थी होते.क्षमतेपेक्षा जास्त विध्यार्थी बसवून आर टी ओ नियमांचे उल्लंघन करत संस्था नागरिक आणि विध्यार्थी यांची जीवाशी खेळत असल्याचे दिसून येत आहे,तसेच संस्थे कडून विद्यार्थ्यांच्या पालकांकडून भरमसाठ फी घेतली जाते परंतु त्या पद्धतीची सोय शाळेच्या मॅनेजमेंट कडून केली जात नाही हे स्पष्ट झाले आहे.तरी या संपूर्ण प्रकरणात आपण स्वतः लक्ष घालून येत्या 8 दिवसात संस्थेची सखोल चौकशी करून त्यांचा परवाना रद्द करावा व यास जबाबदार असणारे संस्थेचे संस्थापक यांच्या वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा मनसेच्या वतीने शाळे समोर आंदोलन करण्याचा इशारा मनसे नेते अमोल काळे यांनी निवेदनाद्वारे शिक्षण अधिकारी सांगली यांना दिला होता,त्यानुसार जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तासगाव यांना आनंदसागर पब्लिक स्कूल & ज्युनिअर कॉलेज तासगांव या शाळेबाबत तक्रार अर्ज अर्ज प्राप्त झालेला आहे,त्यानुषंगाने सदर शाळा आपले कार्यक्षेत्रातील असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे कडील शासन निर्णय क्र. आरटीई २०१४/प्र.क्र.९०/एस एम-१ दिनांक- २१ एप्रिल २०१४ नुसार राज्य शासनाने दिनांक-३१ डिसेंबर २०१३ च्या शासन निर्णयान्वये घोषित केलेल्या स्थानिक प्राधिकरण व सक्षम अधिकाऱ्यांना सहाय्यभूत म्हणून त्रिस्तरीय तक्रार निवारण समित्या गठित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.त्यामुळे आपण तालुकास्तर समितीचे सदस्य सचिव असल्याने दिनांक-१२ एप्रिल २०१४ ची शासन निर्णयाची अवलोकनी घेवून सदर तक्रारीचे निवारण करणेसाठी तक्रार निवारण समिती गठीत करावी व तात्काळ तसे संबधिताना अवगत करावे,व केलेच्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयाकडे सादर करणेत यावा असे आदेश दिले आहेत.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.