प्रतिष्ठा न्यूज

संयोगिता पाटील केंब्रिज स्कूलची वृद्धाश्रमात व अंधशाळेला भेट ; कौटुंबिक व मानवी मूल्य रुजवणारा स्तुत्यउपक्रम

प्रतिष्ठा न्यूज
मिरज 16 : गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या संयोगिता पाटील स्कूलमध्ये सातत्याने कौटुंबिक व मानवी मूल्यांचे संस्कार दिले जातात. याचाच एक भाग म्हणुन डॉ. एन. आर. पाठक वृद्धाश्रम व स्वर्गीय सुशिलाबाई दानचंद घोडावत निवासी अंधशाळेत भेटीचे आयोजन करण्यात आले होते. वृद्धाश्रमात श्री. नाईक यांनी स्थापनेपासून इतिहास सांगितला एका वृद्धाने गायलेल्या सुरेल गीताने विद्यार्थी भारावून गेले. यावेळी विद्यार्थ्यांनी आजी, आजोबा यांच्यासोबत गप्पा मारल्या व ओळख करून घेतली आणि त्यांना खाद्यपदार्थ वाटप केले. येथील नागरिकांना आपुलकीने बोलणारे हवे असतात हा धडा विद्यार्थ्यांना शिकता आला. घोडावत निवासी अंधशाळेत श्री. कुचेकर सरांनी शाळेची माहिती दिली. अंधशाळातील विद्यार्थी निवास व शिक्षण यांची माहिती विद्यार्थ्यांना झाली दिव्यांगाना मदत करणे किती महत्त्वाचे आहे याची जाणीव त्यांना झाली. या शाळेच्या भेटीने प्रतिकूल परिस्थिती समोर हार न मानता कसे घडावे याचा धडा त्यांना मिळाला असे प्राचार्या, श्रीदेवी कुल्लोळी मॅडम म्हणाल्या यावेळी सौ. अर्चना बारसे यांनी शैक्षणिक साहित्य द्वारे पाठ घेऊन माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी तेथील मुख्याध्यापिका सौ. हिरे कुठे व कुचेकर सर यांचे सहकार्य लाभले. या उपक्रमास संस्थेचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील, विश्वस्त विरेंद्रसिंह पाटील, समन्वयक प्राचार्य डॉ. सतीश पाटील, शाळा अधीक्षिका ख्रिस्टीना मार्टिन, प्राचार्या श्रीदेवी कुल्लोळी यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.