प्रतिष्ठा न्यूज

प्रा.ए.ए.मुडलगी यांचा सांगलीमध्ये अमृतमहोत्सवी गौरव ; रु.15 लाखाचा गौरवनिधी पदवीधर संघटनेस अर्पण

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : दक्षिण भारत जैन सभेचे माजी खजिनदार, पदवीधर संघटनेचे विद्यमान चेअरमन प्रा.ए.ए.मुडलगी यांचा अमृतमहोत्सवी गौरव सोहळा व पदवीधर संघटनेचा 34 वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम नेमिनाथनगर येथील राजमती भवन मध्ये उत्साहात संपन्न झाला. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ॲड.धन्यकुमार गुंडे व रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन व विद्यमान संघटक डॉ. अनिल आ. पाटील यांच्या हस्ते चांदीचा कलश व सन्मानपत्र देवून सपत्नीक गौरव केला. अध्यक्षस्थानी द. भा.जैन सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील होते.
प्रारंभी संतशिरोमणी, राष्ट्रसंत आचार्यश्री विद्यासागरजी मुनीराज यांना विनयांजली वाहण्यात आली. कार्यक्रमास्थळी सुरूवातीला दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्रावकरत्न श्री. रावसाहेब आ. पाटील यांनी सभेच्यावतीने त्यांचा सन्मान केला.
व्यक्ति त्याच्या कार्यकर्तृत्वाने ओळखला जातो. सत्कार्यामुळेच माणूस मोठा होतो. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील दुवा म्हणून प्रा.ए.ए.मुडलगी सरांनी समाजकारण केले. दक्षिण भारत जैन सभा, पदवीधर संघटना, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी या संस्थेमध्ये त्यांनी तन,मन, धना समर्पित भावनेने कार्य केले. गेल्या 50 वर्षात त्यांनी केलेल्या कार्याची पोहोच पावती म्हणून इतक्या संख्येने त्यांच्या प्रेम करणारी माणसे याठिकाणी आल्याचे नमूद नमूद करून सरांची शताद्बी महोत्सवही मोठ्या प्रमाणात साजरी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. डॉ. अनिल आ. पाटील यांनी सरांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेवून यापुढेही सामाजिक कार्यात सक्रिय राहण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना प्रा.मुडलगी यांनी मी आज जो काही आहे तो माझ्या आईमुळे आहे. वडिल सावकार व तर आई अशिक्षित, 80 एकर शेती सांभाळावी अशी वडिलांची इच्छा होती पण आईने माझ्यातील गुणस्थाने ओळखून मला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले म्हणूनच मी जीवनात काही करू शकलो. माझे भाऊ, वडिल यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे व आपल्यासारख्या असंख्य प्रेम करणाऱ्या चाहत्यांचा प्रोत्साहन आणि पाठिंबा आहे म्हणून मी थोडेफार समाजकार्य करू शकलो त्यामुळे आज कृतज्ञ असल्याचे सांगून माझ्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांविषयी मी आभार मानतो असे सांगून भावूक झाले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना सभेचे चेअरमन रावसाहेब जि.पाटील म्हणाले सभा आणि पदवीधरच्या जडणघडणीमध्ये सरांचा वाटा महत्त्वपूर्ण आहे. मुडलगी सर म्हणजे पदवीधर संघटना असे सुत्र तयार झाले आहे. सर स्पष्ट, परखड विचारांचे असले तरी उदार व्यक्तिमत्वाचे आहेत. समाजकार्यामध्ये काहीतरी करून दाखविण्याची त्यांची वृत्ती आहे त्यामुळेच त्यांचा याठिकाणी गौरव होतो आहे. सभेला त्यांच्या कार्याचा अभिमान असल्याचे नमूद केले. यावेळी प्रा.डी.ए.पाटील, डॉ. भरत मुडलगी, माजी महापौर सुरेश पाटील, दत्ता डोर्ले, माजी मंत्री श्रीमंत पाटील, माजी विद्यार्थी चंद्रकांत ऐनापुरे, डॉ. सौ. पद्मजा चौगुले यांची मनोगते झाली. सन्मानपत्राचे वाचन डॉ. जयपाल चौगुले यांनी केले. तत्पूर्वी गौरवअंकाचे प्रकाशन झाले. गौरवअंकाविषयी डॉ. प्रकाश पाटील यांनी निवेदन केले.
यावेळी प्रा.ए.ए.मुडलगी यांना गौरव समितीकडून 13 लाख 50 हजारची थैली सुपूर्द करण्यात आली. त्यामध्ये त्यांनी स्वत:चे 1 लाख 50 हजार रक्कम घालून त्यांनी ही रक्कम पदवीधर संघटनेच्या विद्यार्थी सहाय्य निधीला अर्पण केली. तसेच श्रीमतीबाई कळंत्रे श्राविकाश्रमास रु.50 हजारची देणगी जाहीर केली.
सुरूवातीला प्रा.डी.डी.मंडपे यांनी स्वागत, प्रा.एस.डी.आकोळे यांनी प्रास्ताविकामध्ये पदवीधर संघटनेच्या एकूण कार्याचा व प्रा.मुडलगी यांच्या कार्याचा आढावा घेतला. सेक्रेटरी ए.ए.मासुले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. जॉ. सेक्रेटरी प्रा.बी.बी.शेंडगे यांनी आभार मानले. सौ.स्मीता केरीमाने, डॉ. जयपाल चौगुले व प्रा.एम.के.घुमाई यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पदवीधर संघटनेचे संस्थापक आर.पी.पाटील, माजी मंत्री श्रीमंत पाटील, कल्लाप्पाण्णा मगेन्नावर, द.भा.जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष भालचंद्र पाटील, व्हा.चेअरमन दत्ता डोर्ले, मुख्यमहामंत्री डॉ.अजित पाटील, अरविंद मजलेकर, माजी महापौर सुरेश पाटील, वीर सेवा दलाचे बाळासाहेब पाटील, तात्यासाहेब पाटील, डॉ. सुरेश पाटील, बी.आर.पाटील, डॉ. कुबेर मगदूम, शांतिनाथ कांते, शशिकांत राजोबा, प्रा.एन.डी.बिरनाळे, फुलचंद जैन, डॉ.महावीर शास्त्री, राजू झेले, दादा पाटील (चिंचवाडकर) यांच्यासह महाराष्ट्र व कर्नाटतील मुडलगी यांचे सर्व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.