प्रतिष्ठा न्यूज

जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सहकोषाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार गणेशराव लोखंडे यांची निवड

प्रतिष्ठा न्यूज/वसंत सिरसाट
उमरा : नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशराव लोखंडे यांची निवड करण्यात करण्यात आली आहे.
मागील अनेक वर्षांचा पत्रकार क्षेत्रातील अनुभव असलेले व सद्या उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष असलेले गणेश लोखंडे यांनी आपल्या लेखणीतून ग्रामीण भागातील अडीअडचणी सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केले असल्यामुळे त्यांचीनांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा सहकोषाध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल उस्माननगर व मारतळा मराठी पत्रकार संघातील पत्रकार गणेशराव ढेपें, वसंत सिरसाट, संजय देशमुख, बालासाहेब शिंदे, संजय ढेपें, कृष्णा जोमेगावकर, उत्तमराव हंबर्डे, संगमेश्वर बाचे, संतोष कराळे, दौलत पांडागळे, व्ही.आर.शिंदे, बबलू शेख बारूळकर, दिंगाबर तेलंग, विठ्ठल कतरे, केते, प्रदीप देशमुख, बालाजी सिरसाट, माणिक भिसे, विठ्ठल पाटील ताटे, लक्ष्मण कांबळे, लक्ष्मण भिसे, देविदास डांगे, अमजदखान पठाण, संभाजी कांबळे, संभाजी काळम, शुभम डांगे, सुनिल भुरे, शिवकांत डांगे, बाजीराव गायकवाड, धम्माजी गुंडले, यांच्या सह राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.