प्रतिष्ठा न्यूज

शालिनीनगर आरोग्य केंद्राचे स्वातंत्र्यदिनी उद्घाटन संपन्न – संकल्प युवाकडून आरोग्य केंद्र वैद्यकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांचा स्वागत सत्कार

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : वार्ड क्रमांक एक मधील शालिनी नगर येथील मोफत आरोग्य केंद्राचे दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिना रोजी उद्घाटन करण्यात आले. हे आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे, सामाजिक कार्यकर्त्या सौ.संगिता खंडागळे व संकल्प युवा संघटनेकडून प्रशासनाकडे गेले काही महिन्यापासून पाठपुरावा चालू होता. अखेर मागणीला यश येऊन आरोग्य केंद्र चालू झाले आहे.
वार्ड क्रमांक 1 मधील शालिनीनगर येथील या मोफत आरोग्य केंद्रातील नवनिर्वाचित अधिकारी व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा संकल्प युवा संघटनेकडून वृक्षरोप देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे,सामाजिक कार्यकर्ते विश्वजीत पाटील यांच्या हस्ते वृक्षरोप भेट देण्यात आले. स्वप्निल देशमुख, रोहित परमणे,रघुराज पाटील,अविनाश मासाळ, विशाल माने याप्रसंगी उपस्थित होते.
संकल्प युवा प्रदेशाध्यक्ष सागर खंडागळे म्हणाले, शालिनीनगर भागातील हे आरोग्य केंद्र चालू झाल्यामुळे वार्ड क्रमांक एक परिसरातील हजारो नागरिकांची आरोग्य उपचारांची मोफत सोय होणार आहे . संकल्प युवा संघटना व नागरिकांच्या पाठपुराव्याला यश येऊन आरोग्य केंद्र चालू झाले याचा आनंद आहे. प्रशासनाने आरोग्य केंद्र चालू करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत लवकर आरोग्यकेंद्र चालू केले त्याबद्दल मनःपूर्वक आभार .परिसरातील सर्व नागरिकांसह विशेषतः कामगार ,विद्यार्थी, खेळाडू यासह ज्येष्ठ नागरिकांची उपचारांची आता चांगली सोय झालेली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.