प्रतिष्ठा न्यूज

सुनील पाटील यांना आस शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचा “अध्यापक पुरस्कार” प्रदान

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
नांदेड : शहरातील विणकर कॉलनी येथील डॉ राजेंद्र प्रसाद प्राथमिक शाळेचे कृतिशील व हुन्नरी शिक्षक- सुनील पोपटराव पाटील यांना या वर्षीचा आस शिक्षक-शिक्षकेत्तर संघटनेचा जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य “आस शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना” शाखा नांदेडच्या वतीने दरवर्षी शैक्षणिक प्रोत्साहन सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. सन 2023 चा जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” सोहळा दि.31डिसेंबर 2023 रोजी मा.डॉ.दत्तात्रय मठपती  (सहाय्यक शिक्षण संचालक, विभाग लातूर) मा.आ. बालाजी कल्याणकर, मा.पांडुरंग बोरगावकर (अप्पर जिल्हाधिकारी नांदेड ) मा.प्रशांत दिग्रसकर (शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नांदेड)  मा.डॉ.सविता बिरगे मॅडम (शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद, नांदेड) आसचे राज्याध्यक्ष- युवराज पोवाडे, जिल्हाध्यक्ष- नैइमोद्दीन कलीमोद्दीन, सचिव- सुदर्शन उपलंचवार, खाजगी शाळांचे जिल्हाध्यक्ष- निळकंठ मठपती, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुनिल पाटील यांना “अध्यापक पुरस्कार” प्रदान करण्यात आला.
सुनील पाटील यांना आस शिक्षक- शिक्षकेत्तर  संघटनेचा जिल्हास्तरीय “अध्यापक पुरस्कार” मिळाल्याबद्दल शिक्षण विस्तार अधिकारी मा.बालाजी शिंदे, मा. व्यंकट पाटील, मा.रत्नाकर मुंगल पाटील, व चौफाळा बिट क्र. 03 मधील सर्व शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.