प्रतिष्ठा न्यूज

नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन च्या वतीने नवीन कायद्याविरोधात जिल्हाधिकारसो यांच्यामार्फत नितीन गडकरी परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीने सांगली जिल्हाधिकारीसो यांच्या मार्फत नितीन गडकरी साहेब परिवहन मंत्री दिल्ली यांना निवेदन पाठव ण्यात आले की भारत सरकारने गाडी चालक यांच्याकडून अपघात झाल्यास दहा वर्षे कैद व सात लाख रुपये दंड या जीव घेण्यात कायद्याचा जाहीर निषेध करीत सर्व ड्रायव्हर बांधवांवर होणारा अन्याय विरोधात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या वतीने आम्ही निवेदन देत आहोत की या ड्रायव्हरच्या जीव घेण्यात कायद्याविरोधात तिव्र शब्दात सरकारचा निषेध करतो हा कायदा रद्द न झाल्यास येत्या काळात नॅशनल ड्रायव्हर असोसिएशन यांच्या समवेत सर्व संघटना घेऊन वाहने बेमुदत बंद करण्यात येईल असा इशारा संस्थापक अध्यक्ष राजू शिंदे व उपाध्यक्ष इरफानभाई बारगीर यांनी निवेदनाद्वारे देण्यात आला यावेळी संघटनेचे प्रमोद सौंदडे, ताहीर बारगीर, विकी नाटेकर, प्रमोद जाधव, सज्जाद ढाले, किरण पाटील, धीरज देवकते ,नागेश माने, मलिक जमादार, विकास गडदे, संजय वाघमोडे , गजानन देसाई, विकास मोहिते, नाना पाटील, सागर शिंदे ,सुरज गडदे, व अनेक संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच इंडियन ऑइल डेपो मिरज येथील सर्व चालक मालकांना बंद मध्ये सहभाग घेऊन त्यांनाही पाठिंबा देण्यात आला यावेळी इंडियन ऑइल डेपोचे चालक-मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.