प्रतिष्ठा न्यूज

बालाजी पाटील पतलावे यांचे दुःखद निधन- शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

प्रतिष्ठा न्युज / वसंत सिरसाट
उमरा :- लोहा तालुक्यातील उमरा येथील बालाजी लोकडोजी पाटील पतलावे- वय 67 वर्षे यांचे दि. 22 नोव्हेंबर 2023 रोज बुधवार पहाटे 2:00 वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर दि. 22 नोव्हेंबर रोजी दुपारी ठीक 3:00 वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बालाजी पतलावे हे उमरी तालुक्यातील शिंदी येथील पीव्हीके समूह साखर कारखान्यात जेष्ठ कर्मचारी म्हणून कार्यरत होते. यापूर्वी ते कलंबर, वाघलवाडा येथील साखर कारखान्यात उत्कृष्ट काम केले आहे. शांत, संयमी, अतिशय प्रेमळ स्वभाव व वाचनाची आवड असलेल्या पतलावे यांच्या अचानक जाण्याने उमरा परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
त्यांचे पश्चात- पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातु असा परिवार आहे. त्यांच्या अंत्यविधीला पीव्हीके समूहातील अधिकारी, कर्मचारी, मित्र मंडळी, व पाहुणे मोठया संख्येने उपस्थित होते. ते बापूराव पाटील पतलावे यांचे छोटे बंधू तर परमेश्वर पतलावे व संदीप पतलावे यांचे वडील होत.
* प्रतिष्ठा न्यूज कडुन भावपूर्ण श्रद्धांजली..💐
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.