प्रतिष्ठा न्यूज

सांगली जिल्ह्यातील आरटीओ श्री. साळे यांचे निलंबन करण्यात यावे : सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचची मागणी

प्रतिष्ठा न्यूज
सांगली, दि. 9 : सांगली जिल्ह्यातील आर टी ओ ऑफिस मध्ये 6 डिसेंबर 2023 रोजी संबंधित आरटीओ अधिकारी श्री साळे व त्यांच्या मर्जीतील आरटीओ ऑफिस मधील काही एजंट एकत्रित बसून ऑफिसमध्ये कारभार करत असताना चित्रीकरणात कैद झालेली आहे. सदर प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी. श्री साळे यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणी सांगली जिल्हा नागरिक जागृती मंचच्या वतीने पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सतीश साखळकर, गजानन साळुंखे, प्रदीप कांबळे, अंकुश केरीपाळे यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे कि, सांगली जिल्ह्यातील आर टी ओ ऑफिस मध्ये एजंट आणि आरटीओ ऑफिस मधील अधिकारी कर्मचारी सर्वसामान्य माणसाला काम घेऊन आल्यावर मेटाकुटीला आणत आहेत. सर्व कारभार शासनाने ऑनलाईन केला असला तरी काहीतरी काम त्रुटी काढायच्या व नागरिकांना त्रास देऊन पैसे काढायचे असे अनेक प्रकार घडत आहेत. तसेच त्याचा कडेलोट झाला. 6 डिसेंबर 2023 रोजी संबंधित आरटीओ अधिकारी श्री साळे व त्यांच्या मर्जीतील आरटीओ ऑफिस मधील काही एजंट एकत्रित बसून ऑफिसमध्ये कारभार करत असताना चित्रीकरणात कैद झालेली आहे. सदर व्हिडिओ मध्ये एक सामान्य नागरिक व्हिडिओ काढत असताना संबंधित शाळेनामक अधिकारी अत्यंत आरेरावीची भाषा करताना दिसत आहे आम्ही माहिती घेतली असता सांगली जिल्हा आरटीओ ची पोस्ट रिक्त असल्याने अतिरिक्त भार श्री साळी यांना देण्यात आलेला आहे. ते साधारण पाच ते सहा वर्षांपासून सांगली आरटीओ मध्ये कार्यरत आहेत नियमाप्रमाणे त्यांची बदली होणे अनिवार्य होते मात्र ती झालेली नाही तरी सदर व्हिडिओ मुळे सांगली जिल्हा आरटीओ ची अब्रू महाराष्ट्राच्या वेशी वर टागलेले आहे.
तरी संबंधित विषयाची संपूर्ण चौकशी करून श्री साळे यांचे निलंबन करण्यात यावे अथवा त्यांची बदली करण्यात यावी अन्यथा आम्हाला आंदोलन करण्याचे शिवाय पर्याय नाही आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहात आपण पालकत्व स्वीकारून सदर प्रकरणाची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.