प्रतिष्ठा न्यूज

माई घाट सांगली येथे श्री स्वामी समर्थ प्रकट दिना निमित्त संजयकाका पाटील यांनी साधला भाविकांशी संवाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : श्री स्वामी समर्थ प्रगट दिनानिमित्त खासदार संजयकाका पाटील यांच्या हस्ते माई घाट सांगली येथे स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. तसेच भाविकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते
महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ करण्यात आला.
संजयकाका पाटील यांनी प्रकट दिनानिमित्त श्री स्वामींचे दर्शन घेतले. संजयकाका यांच्या हस्ते स्वामींची आरती करण्यात आली. तसेच सुमारे दहा हजार भाविकांना वाटण्यात येणाऱ्या महाप्रसाद वाटपाचा प्रारंभ संजयकाका पाटील यांनी केला. रक्तदान शिबीर, विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम राबवून अत्यंत उत्साहात प्रकट दिन साजरा करण्यात आला. संजयकाका पाटील यांनी भाविकांशी संवाद साधून चर्चा केली.
यावेळी माजी आमदार नितीन शिंदे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष पप्पू डोंगरे, माजी नगरसेवक विक्रम सावर्डेकर, राजू नलवडे, सुरज चोपडे, ऋषीकेश सूर्यवंशी यांच्या सह सुमारे १० हजार भाविक उपस्थित होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.