प्रतिष्ठा न्यूज

कंधार येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

प्रतिष्ठा न्युज/ राजू पवार  
नांदेड : कंधार येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी, १७, नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता शिवसेनेच्या सिंहगड जनसंपर्क कार्यालयामध्ये त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
      यावेळी शिवसेनेचे महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथदादा पवार, तालुकाप्रमुख परमेश्वर जाधव,
विधानसभा संघटक गणेश कुंटेवार, शहर प्रमुख अतुल  पापीनवार, युवासेना उपजिल्हाप्रमुख दिगांबर इंगोले, उपतालुकाप्रमुख दादाराव शिंदे, संजय ढाले, रमाकांत देवणे, संतोष वडवळे, रविराज जाधव, सिदार्थ गायकवाड, सयाजी पंदलवाड, योगेश गोरे, धोंडीबा भिंगेवाड, अविनाश कल्याणकर आदींसह शिवसैनिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.