प्रतिष्ठा न्यूज

कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांना छावा काव्य पुरस्कार प्राप्त

प्रतिष्ठा न्यूज
चिंचवड प्रतिनिधी : शब्दधन काव्य मंच पिंपरी चिंचवड यांचे वतिने पसाहित्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रतिभा कॉलेज येथे ८९व्या मराठी साहित्य संमलनाचे अध्यक्ष मा डॉ श्रीपाल सबनिस व ललिता सबनीस यांचे हस्ते कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांना “छावा काव्य पुरस्कार ” प्रदान करण्यात आला .त्यावेळी महाराष्ट्रातील नामवंत कवी, कवयित्री यांना शब्दधन प्रतिभा पुरस्कार, कवी अरविंद भुजबळ स्मृती पुरस्कार आणि छावा काव्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कवयित्री शामला पंडित (दीक्षित ) यांचे ३ चारोळी संग्रह , १२ कविता संग्रह , भावदर्पण कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत . त्यांनी शामलाक्षरी हा नवकाव्य प्रकार निर्माण करून साहित्याला देणगी दिली आहे . समान दोन शब्द ,अर्थ भिन्न असलेले दोन शब्द वापरून शामलाक्षरी काव्य रचना केली जाते . थोड्या कालावधीमध्ये शामलक्षरी काव्य प्रकार लोकप्रिय झाला आहे .विशेषतः विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी निर्माण व्हावी यासाठी हा काव्यप्रकार खूप उपयुक्त व आनंदी असा आहे . शामलाक्षरी काव्यामुळे निश्चितच वाचन संस्कृती वाढेल यात शंका नाही . त्यांनी “दिलदार मैत्री ” या कवितेचे सादरीकरण केले . शामलाताईंची कविता भावसर्मपण करणारी व संस्कृती जपणारी आहे असे प्रतिपादन मा . डॉ.श्रीपाल सबनिस यांनी केले . प्रणाली प्रकाशनामार्फत अनेक पुस्तके प्रकाशित होत आहेत .प्रणाली प्रकाशन च्या माध्यमातून अनेक संग्रह प्रकाशित व्हावे असे आशीर्वाद उभयतांनी दिले .दिलासा व शब्दधनचे मा . सुरेश कंक, मा .प्रकाश घोरपडे, मा .सुभाष चव्हाण, मा . तानाजी एकोंडे या सर्वांनी कार्यक्रमाचे नियोजन केले .
नंदकुमार मुरडे , मधुश्री ओव्हाळ ‘श्रीकांत चौगुले कांकरीया इ मान्यवार उपस्थित होते .
प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचलन केले . नामदेवराव चौधरी यांनी आभार मानले . पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.