प्रतिष्ठा न्यूज

संस्कार भारती सांगली जिल्हा समितीतर्फे गायिका श्रद्धा जोशी दांडेकर व तबला वादक निलेश अनंत काळे यांना पुरस्कार जाहीर

प्रतिष्ठा न्यूज / योगेश रोकडे 
सांगली : सांगलीत संस्कार भारतीची स्थापना ७ ऑगस्ट १९९२ रोजी झाली. गेली ३१ वर्षे ‘कलेतून राष्ट्र साधना’ या विचारातून प्रेरित होऊन काम करणारी सांगली जिल्हा समिती एका परीने अविरत प्रयत्न करते आहे तो कलासमृद्ध समाजाच्या निर्मितीचा.
    सांगली शहर व परिसरातील नृत्य ,नाट्य, चित्रकला, संगीत ,रांगोळी इत्यादी कलेतील कलाकारांना विशेषतः नवोदित कलाकारांना संस्कार भारतीची स्थापना ही सुवर्णसंधीच मानावी लागेल.
    सांगली समितीने कलाक्षेत्रातील दिग्गजांना मानाचे पुरस्कार दिलेले आहेत कै. इंदिराबाई खाडिलकर स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा कै. गुरुवर्य मटंगे बुवा पुरस्कार तसेच सारंगी वादक पै. महंमद हनीफ मुल्ला स्मृती प्रित्यर्थ दिला जाणारा साथीदार पुरस्कार म्हणजे सांगली समितीच्या कलारसिकतेची पावतीच ठरावी.
    यंदा ३१ व्या वर्धापन दिना निमित्त कै. गुरुवर्य मटंगे बुवा पुरस्कार मिरजेच्या युवा गायिका श्रद्धा जोशी दांडेकर तसेच साथीदार पुरस्कार सांगलीचे युवा तबला वादक  निलेश अनंत काळे यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा रविवार दि. ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ०४:३० वाजता भावे नाट्यगृह येथे संपन्न होईल. या प्रसंगी सांगलीचे आमदार सुधीर दादा गाडगीळ व ज्येष्ठ लेखक, चित्र नाट्य कर्मी  अभिरामजी भडकमकर उपस्थित असतील. अशी माहिती  संस्थेच्या सचिव कविता कुलकर्णी यांनी दिली.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.