प्रतिष्ठा न्यूज

निंबळकची सासनकाठी सिद्धनाथाच्या भेटीला

प्रतिष्ठा न्यूज
निंबळक प्रतिनिधी : तासगाव तालुक्यातील येरळा काठावरील सिद्धनाथ भक्ताचे असणारे निंबळक गावातून दर वर्षी प्रमाणे सिद्धनाथ देवाची सासनकाठी कार्तिक कृ.पक्ष 14 म्हणजेच नोव्हेंबर मधील अमावश्या यादिवशी मानाची सासन काठी सिद्धनाथ जोगेश्वरी देवांच्या रथाला भेटण्यासाठी जात असतात.
या वर्षी ही नव्या उत्साहात सिद्धनाथ भक्तानी मागील कोरोनाच्या संकटामुळे रद्द झालेल्या यात्रेमुळे या वर्षी नव्या जोमाने सासन काठी देवाच्या भेटीला घेऊन आले. सकाळी देवाचा नैवद्य, आरती बरोबरच लेझीम च्या तालात देवाचा नैवद्य वाजत गाजत मंदिरात पाठवण्यात आला. आणि दुपारी सासनकाठी रथाच्या भेटीला रवाना करण्यात आली. भेटीनंतर एक दिवसाचा मुक्काम करून सासनकाठी सिद्धांनाथाचा भक्त भोजलींग देवाच्या भेटीला जाऊन भोजलींग डोंगरावरील विधी पार पाडून भक्त आणि मनाची सासन काठी आपल्या मूळ देवस्थान निंबळक येथील सिद्धनाथ मंदिरात प्रवेश करून यात्रेचा सोहळा संपन्न होणार आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.