प्रतिष्ठा न्यूज

बौध्द व मातंग समाजाचे उद्या नागाव (नि) येथे आमरण उपोषण.. वंचित बहुजन आघाडीचें निवेदन..

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : नागांव (नि) येथील बौध्द समाज व मातंग समाजातील गायरान जागेतील कुटूंबांना पूर्वीपासून येण्या जाण्याचा रस्ता नाथदेव विकास सोसायटीकडून कंपाऊंड मारुन बंद करण्यात आला आहे,याबाबत वंचित बहुजन आघाडी समाजाच्या वतीने दि.6/11/2023 रोजी पोलीस निरीक्षक तासगाव यांना निवेदन देण्यात आले होते परंतु याबाबत कोणतीही कारवाई झालेली नाही,त्यामुळे वंचित बहुजन आघाडी सर्व बौध्द समाज व मातंग समाज उद्या दि. ०६/१२/२०२३ सकाळी ११ वाजलेपासून नागांव (नि) येथे  खालील मागण्या साठी आमरण उपोषणास बसत असून याबाबतचें निवेदन तासगाव पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आले आहे.
दलित व मागासवर्गीय लोकांची घरे पाडणारे नाथदेव विकास सोसायटीचे चेअरमन व व्हाईस चेअरमन यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा,दलित व मागासवर्गीय लोकांचा बंद केलेला रस्ता तारेचे कंपाऊंड काढून खुला करण्यात यावा,
नाथदेव विकास सोसायटी गायरान भूमीत असताना त्याच्या ८अ च्या उता-यावरील बोगस नोंदी रद्द करणेत याव्यात,दलित व मागासवर्गीय यांची घरे पाडून कंपाऊंड मारण्यात आले तरी त्या घरांना नुकसान भरपाई मिळावी,या ठिकाणी ८५% घरे हि दलित व मागासवर्गीय यांची असून दलीत विकास निधी तेथे खर्च करण्यास मान्यता देणेत यावी व शासनाच्या घरकुल योजनेने बांधलेले आहेत,या मागण्या लवकरात लवकर मान्य करून आम्हाला न्याय दयावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.