प्रतिष्ठा न्यूज

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोरआज विविध संघटनांचे जुनी पेन्शनसाठी धरणे आंदोलन

प्रतिष्ठा न्युज /वसंत सिरसाट
नांदेड : शासकीय निमशासकीय कर्मचारी, शिक्षक शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती, नांदेड, जुनी पेन्शनसाठी धरणे आंदोलन मंगळवार, दि.14 मार्च 2023 सकाळी 11 ते सायं 5 वाजेपर्यंत जुनी पेन्शन योजना लागु करावी, या मागणीसाठी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या राज्याव्यापी संपात सर्वच विभागातील कर्मचारी, शिक्षक संघटनांनी भाग घेतला आहे. हा संप यशस्वी करण्यासाठी व या संपास पाठिंबा देण्यासाठी मंगळवार, दि.14 मार्च 2023 रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन अनेक संघटनांच्या मान्यवराकडून करण्यात येत आहे.
यात देविदास बसवंते (प्रदेशाध्याक्ष- अ.भा.प्रा.शिक्षक संघ,नांदेड) इंजि.सिध्दार्थ पाटील (राज्य उपाध्यक्ष मागासवर्गीय विदूत कर्मचारी नांदेड) तानाजी पवार (जिल्हाध्यक्ष- शिक्षक सेना नांदेड) गणेश शिंगे (अध्यक्ष- मनपा कामगार संघटना नांदेड) गणेश अंबेकर (जिल्हाध्यक्ष- वाहन चालक संघटना) लक्ष्मण नरमवार (जिल्हाध्यक्ष- कर्मचारी मध्यवर्ती संघटना नांदेड) वसंत जारीकोटे (राज्य कोषाध्यक्ष- कृषी सहाय्यक संघटना) अशोक पाटील मारतळेकर  (जिल्हाध्यक्ष- अ.भा.प्राथमिक शिक्षक संघ) इंजि. अभिजीत बळेगांवकर (जिल्हाध्यक्ष- बानाई नांदेड) रोहिदास कांबळे (विभागीय अध्यक्ष- महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ) चंद्रकांत दामेकर (राज्य नेते- म.रा. पदविधर प्रा.शिक्षक सभा) के.पी.सोने (अध्यक्ष- अध्यक्ष, हक्क संवर्धन समिती, नांदेड) जी.आय.पेंडकर (जिल्हाध्यक्ष- शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना) टी.पी.वाघमारे (जिल्हाध्यक्ष- महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ) शंकरराव इंगळे (राज्य उपाध्यक्ष- म.रा.पदविधर प्रा. शिक्षण सभा) प्रकाश देशमुख (कार्याध्यक्ष- शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना) यशवंत कांबळे (महासचिव- महाराष्ट्र बहुजन शिक्षक महासंघ) फारूक बेग (जिल्हाध्यक्ष- म.रा.पदविधर प्रा.शिक्षक) काळबा हनमंते (अध्यक्ष, स्वामी रामानंद तिर्थ महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचारी संघटना) प्रा.परशुराम येसलवाड (ज्युक्टा) प्रभु सावंत (प्रदेश उपाध्यक्ष अ.म.प्राथमिक सेवा निवृत्त शिक्षक संघ, महाराष्ट्र)
तसेच संयोजक : कनिष्क सोनसळे, इंजि. भरतकुमार कार्निवे, काकासाहेब डायरे, इंजि. विपक बनसोडे, इंजि.भिमराव धनजकर, अरुण गादगे.
व श्याम निलंगेकर (संघटक, समन्वय समिती, नांदेड) यांनी या संपात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.