प्रतिष्ठा न्यूज

काटकळंबा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी पंचफुला बाई वाकोरे यांची बिनविरोध निवड

प्रतिष्ठा न्यूज/राजू पवार
कंधार दि.12 : कंधार तालुक्यातील काटकळंबा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी खा.चिखलीकर समर्थक श्रीमती पंचफुलाबाई दिगंबरराव वाकोरे यांची बिनविरोध निवड झाली
काटकळबा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदांची निवडणूक दि १२ आक्टोबर रोजी ग्राम पंचायत कार्यालयात ठेवण्यात आली होती अध्याशी अधिकारी तथा पंचायत समिती विस्तार अधिकारी के.व्ही. रेणेवाड यांच्या अध्यक्षतेखाली, ग्रामविकास अधिकारी जे पी मुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली यावेळी श्रीमती पंचफुलाबाई वाकोरे यांचा एकमेव सरपंच पदासाठी अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी रेणेवाड साहेब यांनी घोषीत केले नवनिर्वाचित सरपंच खा प्रताप पा चिखलीकर यांच्या चुलत भगिनी असल्याने गावच्या विकास कामांसाठी निधी कमी पडणार नसल्याचे गावकर्यात बोललं जातं होत यावेळी ग्रामपंचायत सदस्य उज्वला गजानन कुठारे रंजना माधव कांबळे शैलेजा जितेंद्र चावरे पदमिन गजानन कांबळे सुकेशना साईनाथ कोळगिरे वजिर पठाण अशोक चावरे लक्ष्मण विभुते माधव वाकोरे शिवाजी वाकोरे आदि उपस्थित होते यावेळी नवनिर्वाचित सरपंच पंचफुलाबाई दिगंबराव वाकोरे यांचा ग्राम पंचायत सदस्यांच्या वतिने सत्कार करण्यात आला.

आई सरपंच होताच उपसरपंच मुलाचा राजीनामा
काटकळंबा ग्राम पंचायतीच्या सरपंच पदी पंचफुलाबाई वाकोरे यांची बिनविरोध निवड होताच मागील २ वर्षापासून उपसरपंच असणारे शिवाजी वाकोरे यांच्या मातोश्री सरपंच होताच त्यांनी राजीनामा दिला.

गावच्या विकासासाठी सर्व गावकर्यीना सोबत घेऊन विकास कामांना प्राधान्य देण्यात येईल गावची शांतता स्वच्छ गाव सुंदर गाव करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे नवनिर्वाचित सरपंच पंचफुलाबाई दिगंबराव वाकोरे यांनी सांगितले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.