प्रतिष्ठा न्यूज

तासगावात अवजड वाहनातून दगड,मुरूमची वाहतुक वाढली…रस्त्यांची दुरावस्था…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार 
तासगाव : तासगाव शहर तसेच तालुक्यात सध्या गौण खनिजाची वाहतूक जोरात सुरू आहे.अवजड वाहनातून खडी,मुरूम,दगड,यांची अवैध मार्गान वाहतूक सुरू आहे.या वाहतुकीकडे पोलीस व महसूलचे दुर्लक्षं असल्याने तासगाव तालुक्यात गौण खनिजाची वाहतूक जोमात सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.
गौण खनिजाच्या वाहतुकीने शहरातील आणि तालुक्यातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.मुरूम,दगड,खडी वाहतूक करणारी डंपर रस्त्यावर सुसाट धावत असताना अनेक वेळा लहान,मोठे अपघात झाले आहेत.अवजड डंपरची वाहतूक बेदररपणे व खुलेआम सुरू आहे.या गौण खनिज वाहतुकी
वर त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांतुन जोर धरू लागली आहे.तासगाव शहरात आणि तालुक्यात मोठ्या प्रमाणात खाजगी बांधकामे,रस्ते व काही ठिकाणी महामार्गाची कामे सुरू आहेत. यासाठी लागणारा मुरूम,दगड,खडी यांचे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे.या उत्खननातून शासनाला किती महसूल मिळतो व किती बुडतो याची चौकशी करण्याची गरज आहे.दगड, मुरूम यांची वाहतूक करणारे
वाहन चालक,मालक रीतसर महसूल विभागाचा परवाना घेतात की नाहीत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उत्खननासाठी आवश्यक रॉयल्टी भरतात की नाहीत याचीही चौकशी होते का याबाबत ही प्रश्नचिन्ह आहे.अशा बेकायदेशीर वाहतुकीवर कुणाचेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.