प्रतिष्ठा न्यूज

तासगाव येथे मंगेश चिवटे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिरासह विविध कार्यक्रमानी संपन्न

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : डॉ.श्रीकांत शिंदे फाउंडेशन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष आणि आधार शिक्षण संस्था संचलित बौद्धिक अक्षम (मतिमंद) व मूकबधिर मुला-मुलींच्या शाळा व कर्मशाळा तासगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा. श्री मंगेश चिवटे मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष प्रमुख,मुख्यमंत्री ओ एस डी आरोग्य विभाग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.यावेळी गौरव गुळवणी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष महाराष्ट्र राज्य तसेच अनिरुद्ध शिंदे, लौकिक खेराडकर,सचिन शेटे,कुमार शेटे तासगाव अर्बन बँक व्हाईस चेअरमन,उदय वाटकर तासगाव अर्बन बँक संचालक,श्रीकांत कुलकर्णी तासगाव अर्बन बँक सिओ, डॉ.बिभीषण सारंगकर एम एस ग्रामीण रुग्णालय तासगाव,मनोज नाना शिंदे,धनाजी तात्या पाटील, संजय पैलवान,चक्रपाणी दौंड आदी मान्यवर उपस्थित होते.मा
मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयातील विद्यार्थी आणि पालकांचे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते.शिबिरात आलेल्या सर्वच विद्यार्थी व पालक यांना यावेळी स्नेहभोजन ठेवले होते. कार्यक्रमाचे आयोजन श्री सचिन ज्ञानेश्वर शेटे यांनी केले होते.मा.मंगेश चिवटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने  मा.गौरव गुळवणी व विद्यार्थी यांच्या हस्ते केक कापन्यात आला.तसेच विवीध क्षेत्रात कौशल्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे सत्कार यावेळी करण्यात आले.कार्यक्रमाच्या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केले.संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शन आणि नियोजन आधार शिक्षण संस्थेचे सचिव मा.संजय राजमाने सर व श्री.सचिन ज्ञानेश्वर शेटे तासगाव यांनी केले.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.