प्रतिष्ठा न्यूज

मराठा स्वराज्य संघाच्या रोजगार व उद्योजक मेळाव्यास उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज 
सांगली प्रतिनिधी : मराठा स्वराज्य संघाच्या वतीने सांगली शहरातील व जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी व नवीन उद्योजकांसाठी मेळावा आयोजित केलेल्या रोजगार व उद्योजक मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

दक्षिण शिवाजीनगर चांदणी चौक, स्वर्गीय खासदार डी जी पाटील सभागृहामध्ये आयोजित केलेल्या मराठा स्वराज्य संघाच्या वतीने सांगली शहरातील व जिल्ह्यातील बेरोजगार युवकांसाठी व नवीन उद्योजका साठी मेळावा आयोजित केला होता. हा मेळावा सकाळी अकरा वाजता सभागृहात सुरू झाला सुरुवातीस सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्ष व अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सदस्य श्रीमती जयश्री मदन भाऊ पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलवन केले व मिरज शहराचे माजी आमदार प्राध्यापक आदरणीय शरद पाटील सर यांचे हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मेळाव्यास सुरुवात झाली. यावेळेला मराठा स्वराज्य संघाचे राज्य प्रवक्ते सामाजिक संघटनेचे अध्यक्ष माननीय संतोष पाटील यांनी स्वागत व प्रस्तावना करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यावेळी मराठा स्वराज्य संघाचे संस्थापक अध्यक्ष माननीय महादेव बापू साळुंखे यांनी प्रमुख अतिथी व मान्यवरांचे शालपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळेला प्राध्यापक माजी आमदार माननीय शरद पाटील सर म्हणाले की या वास्तूमध्ये मी स्वर्गीय खासदार डी जी पाटील खासदार असताना माझे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते व त्या वेळेला मी त्यांच्याकडे कामा संबंधित अनेक वेळा या वास्तूमध्ये येत होतो.आता या ठिकाणी त्यांच्या नावाने उभा झालेली बिल्डिंग पाहून आनंद वाटला व त्यांचा वारसा संतोष पाटील चालवीत आहेत हे बघून आनंद वाटला आहे. येथे आलेल्या उद्योजक व नोकर भरतीसाठी आलेले बेरोजगार युवकांसाठी त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षश्रीमती जयश्री पाटील म्हणाल्या की राज्यामध्ये आणि देशांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या सरकारमुळे बेरोजगारी वाढले आहे येथे उपस्थित युवकांच्या प्रतिसादामुळे दिसून येत आहे असे वक्तव्य केले व राज्य प्रवक्ते संतोष पाटील करत असलेल्या कामाचे कौतुक केले ते युवकासाठी काही ना काही काही करत असताना आम्हाला दिसत आहे त्यामुळे संतोष पाटील यांचा भविष्यात जरूर विचार केला जाईल. यावेळी खूप मोठा प्रतिसाद नोकर भरतीसाठी मिळत आहे व त्यांनी बेरोजगारासाठी भरलेल्या मेळाव्यास शुभेच्छा दिल्या व नऊ उद्योजकांना त्यांनी मार्गदर्शन केले . या वेळेला संस्थापक अध्यक्ष मा.महादेव बापू साळुंखे म्हणाले की मराठा स्वराज्य संघ नेहमीच युवकासाठी अनेक मेळावे आयोजित करत आहेत मोदी सरकार मुळे या युवकावर ही बेरोजगाराची वेळ आली आहे आले. नवीन उद्योग सुरू करणाऱ्या उद्योजकांना काही बँका त्रास देत असतील तर त्यांनी आमच्या संघटनेशी भेटावे बँकेच्या दारात जाऊन आम्ही आंदोलन केले जाईल असा इशारा मराठा स्वराज्य संघाचे अध्यक्ष महादेव बापू साळुंखे यांनी दिला. या वेळेला जमलेल्या तरुणांमधून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला. या वेळेला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या समन्वयका निशा पाटील मॅडम यांनी नवीन बेरोजगार युवकासाठी व उद्योजकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडून ज्या योजना आहेत त्या योजनांची सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले. यावेळी यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी समन्वयक मा. सर्जेराव पाटील यांनी आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणामध्ये बेरोजगार युगासाठी व त्यांच्या साठी असणाऱ्या योजनांसाठी माहिती देऊन मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजक व मराठा स्वराची संघाचे राज्य प्रवक्ते मा संतोष पाटील यांनी यावेळेला मार्गदर्शन करताना म्हणाले की हा आमचा चौथा रोजगार मेळावा असून आत्तापर्यंत आम्ही 500 ते 700 बेरोजगार युवकांना नोकऱ्या दिल्या हा आमचा पाचवा रोजगार मेळावा असून सांगलीतील बेरोजगार युवक सध्या हाताला काम नाही म्हणून अनेक अवैध व्यवसाय व गुंडगिरी कडे वळू लागले आहे म्हणून त्यांच्या हाताला काम मिळावे म्हणून मी कायम या रोजगार मेळाव्याचे आयोजन करीत राहणार असे सांगितले. यावेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे यांनी सर्वांची ओळख करून दिली व शेवटी एम के कोळेकर यांनी आभार मानले या वेळेला अनेक उद्योजक उपस्थित होते यावेळेला उद्योजक व शून्यातून निर्मिती केलेली इनोव्हा टेक्नॉलॉजी कंपनीचे डायरेक्टर अनिरुद्ध शिंदे यांनी नवीन युवकांना मार्गदर्शन केले. यावेळी भारतीय युवा शक्ती ट्रस्टचे संचालक नंदकुमार कांबळे यांनी बँक कशी लोन देतात येणारे अडथळे व या संदर्भात लागणारे कागदपत्रे यांच्या विषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी अमोल चव्हाण,प्रदीप पाटील,रघुनाथ नार्वेकर,अनमोल पाटील, सुशांत कदम,स्वप्निल शेटे,अरविंद ठोंबरे, खूदबुद्दीन मुजावर, प्रथमेश शेटे व अनेक पदाअधिकारी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी पार पाडला या वेळेला आलेल्या तीनशे विद्यार्थ्यापैकी 67 विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.