प्रतिष्ठा न्यूज

सांगशी परिसरात गव्यांचा पुन्हा धुमाकूळ. शेतकरी हैराण, नुकसान भरपाईची मागणी

प्रतिष्ठा न्यूज /तुकाराम पडवळ
गगनबावडा : काल मध्यरात्री चार ते पाच रानटी गव्यानी ऊस शेतात येऊन सांगशी ता. गगनबावडा येथील शेतकरी अशोक रामचंद्र पडवळ, उदय गोविंद पडवळ व पांडुरंग गणपती पडवळ यांचे तोडणीला आलेल्या उसांचे प्रचंड प्रमाणात नुकसान केले. चारच दिवसांपूर्वी सांगशी येथील दत्तात्रय दिनकर वारिक यांचे ऊस शेतात येऊन लावणीसाठी अंथरलेली सर्व कांडी खाऊन फस्त केली होती. व त्यांचे जवळजवळ दहा हजार चे नुकसान केले होते.
यामुळे शेतकरी पुरते हैराण झाले असून हवालदिल झाले आहेत.
वरील शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे होऊन आम्हाला तातडीने नुकसान भरपाई मिळावी म्हणून वनखात्याकडे मागणी केली आहे.

वनविभागाने तारेचे कुंपण घालणे, चर खोदणे, जंगलात पानवठा निर्माण करणे. आदी उपाययोजना करणे जरुरीची आहे.
– कृष्णा पाटील, माजी सरपंच व विद्यमान सदस्य

इतर तालुक्यांपेक्षा गगनबावडा तालुक्याला तुटपुंजा मोबदला दिला जातो, यासाठी कृषी विभागाने याची दखल घेतली पाहिजे.
– बंडू आप्पा पडवळ, संचालक डी वाय पाटील साखर कारखाना

साखर कारखाने वेळीच तोडणी देत नाहीत. तेरा महिने झाले तरी ऊस तोडणी चा नंबर नाही.
– अशोक पडवळ, नुकसानग्रस्त शेतकरी

गेल्याच वर्षी सोलर कुंपण साठी सांगशी येथील दहा नावे दिली व ती मंजूरही आहेत. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर उपाययोजना करण्याचे प्रस्ताव वन खात्याने पाठवले आहेत.
– संग्राम पाटील,वनरक्षक, वन खाते, गगनबावडा

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.