प्रतिष्ठा न्यूज
आपला जिल्हा

तासगावात श्री हनुमान जन्मोत्सव उत्साहात

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव शहरासह तालुक्यातील सर्वच श्री हनुमान मंदिरात श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला असून भजन, कीर्तन,शोभायात्रा काढून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.चैत्र शु. पौर्णिमेला सर्वत्र सकाळी 6:00 च्या दरम्यान श्री हनुमंतांचा जन्मोत्सव साजरा केला जातो.यावेळी शहरातील श्री गणेश चॅरिटेबल ट्रस्ट पागा गल्ली यांच्या वतीने वसंतपूजा,श्रींचा जन्मकाळ, महाआरती, भजन,श्रींची मिरवणूक,महाप्रसाद,संस्कार शिबिर प्रात्यक्षिक,भावगीत भक्तिगीत गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच येथील जोशी कुटुंबीयांचे जुन्या काळातील हनुमान मंदिर प्रसिद्ध आहे.संतोष जोशी (सर) यांनी जन्मोत्सवावेळी सत्ययुग,त्रेतायुग,द्वापारयुग आणि कलियुग या युगांमधील मानवाचा आयुष्यकाल कसा कमी होत गेला याचा इतिहास विषद करून हनुमान जन्मकाळाची कथा सांगितली.तर नाझर वैद्य तथा डॉ.नरसिंह परचुरे व श्रीपाद परचुरे यांच्या मारुती मंदिर येथे ह.भ.प.सुरेश काणे यांनी हनुमान जन्मकाळाची कीर्तन सेवा पार पाडली.शहरातील सगळ्याच मंदिरात बुद्धी आणि शक्तीची देवता असणाऱ्या भगवान हनुमंतांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला असून प्रभू श्रीरामांच्या जन्मोत्सवानंतर काही दिवसातच पार पडलेल्या हनुमान जन्मोत्सवाने भाविकात मोठे चैतन्याचे वातावरण होते.यावेळी शहरातील अनेक मंदिरात महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.