प्रतिष्ठा न्यूज

अंनिसचे राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान सुरू

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ‘राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान’ सुरू आहे, यामध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सामिल होऊन अंनिसचे सभासद व्हावे असे आवाहन सांगली जिल्हा अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारुख गवंडी, डॉ. संजय निटवे  यांनी केले आहे.
अंनिस संघटनेची भूमिका सांगताना अंनिसचे  कार्यकर्ते राहुल थोरात म्हणाले की, अंनिस ही महाराष्ट्रातील संत समाजसुधारक यांचा धर्मचिकित्साचा वारसा पुढे चालवते. व्यक्तीच्या मनात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करुन समाज विवेकी बनवणे हे अंनिसचे अंतिम ध्येय आहे. अंनिसचा कोणत्याही देवा धर्माला विरोध नसून देवा धर्माच्या नावावर मानसिक, आर्थिक शोषण करणाऱ्या कुप्रवृत्तीला विरोध आहे. अंनिस मध्ये काम करणेसाठी कोणत्याही जाती धर्माची,आस्तिक नास्तिक अशी  कोणतीही अट नाही. भारतीय संविधानावर विश्वास असणारा प्रत्येक जण अंनिस मध्ये सहभागी होऊ शकतो.
या अंनिस सभासद नोंदणी अभियानांतर्गत मार्च, एप्रिल आणि मे २०२३ या तीन महिन्यात राज्यभरात अंनिसचे ५००० सभासदांची नोंदणी केली जाणार आहे.ज्यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सामाजिक कार्यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी अंनिसच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी संपर्क करा. अंनिसचा छापील सभासद नोंदणी फॉर्म भरून अंनिसचे सभासद व्हा. आपल्या सांगली जिल्ह्यात अंनिस सभासद फॉर्म सुहास यरोडकर ९९७०१७४६२८ यांचेकडे उपलब्ध आहेत. तसेच अंनिस सभासद नोंदणी साठी अमर खोत (तासगाव), वाघेश साळुंखे (विटा), सुनील भिंगे (आटपाडी), इब्राहिम नदाफ (जत), प्रा. दादासाहेब ढेरे (कवठेमहांकाळ), मारुती शिरतोडे (पलूस कडेगाव) , प्रा. एस. के. माने (इस्लामपूर), डॉ. सविता अक्कोळे (सांगली), हनुमंत सुर्यवंशी (मिरज) याचेशी संपर्क साधावा.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.