प्रतिष्ठा न्यूज

प्रतिष्ठा न्यूजने अल्पावधीतच वाचक संख्या वाढवून आपली प्रतिष्ठा निर्माण केली- उमरेकर

प्रतिष्ठा न्युज/ वसंत सिरसाट
उमरा :- येथील ग्रामपंचायत कार्यालयात प्रतिष्ठा न्युज दिनदर्शिका प्रकाशन सोहळा कार्यक्रम उपसरपंच, ग्रामविकास अधिकारी व गावकरी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी लोहा खरेदी विक्री संघाचे संचालक तथा गावचे उपसरपंच- स्वप्नील पाटील उमरेकर म्हणाले की प्रतिष्ठा न्युज आपल्या भागातील समस्यांना वाचा फोडण्याचे काम करत असून अल्पावधीतच प्रतिष्ठा न्यूजने चांगले वाचक निर्माण केले असून प्रतिष्ठाने आपली प्रतिष्ठा वाढविली आहे. येणाऱ्या काळात प्रतिष्ठने आपल्या लेखणीतून समाजातील अडीअडचणी व अन्याय दूर करण्यासाठी असेच लिखाण करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
तर ग्रामविकास अधिकारी- स्वप्नाली चव्हाण मॅडम यांनी दिनदर्शिका चे कौतुक करत सुंदर छपाई, योग्य ती माहिती व जाहिरातीने नटलेली दिनदर्शिका प्रत्येकाच्या घराघरात असली पाहिजे असे गौरव उदगार काढले.
यावेळी- डॉ. राजेश सिरसाट, सचिन सिरसाट, एन.डी. सिरसाट, वसंत सिरसाट, शशिकांत पाटील, स्वप्ना झंपलवाड (ए एन एम), दादाराव कदम, मनोहर सिरसाट, जीवराज सिरसाट, गुणवंत सिरसाट, राजेश जाधव, दाजीराव सिरसाट, सुमित लोंढे, मुबिन शेख, मारोती वडजे, स्वप्नील सिरसाट, शेषराव पाटील, मारोती पवळे, शंकर वडजे, पंडितराव मुकादम, मारोती गंगातीरे सह अनेकांची उपस्थिती होती.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.