प्रतिष्ठा न्यूज

पंढरपूर सिंहगड मध्ये “आदित्य २के२४” उत्साहात संपन्न

प्रतिष्ठा न्यूज
पंढरपूर प्रतिनिधी : एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये मंगळवार दिनांक २६ मार्च २०२४ रोजी “आदित्य २के२४” राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यक्रमाचे उद्घाटन तामिळनाडू येथील संशोधक डाॅ. रेखा पचयप्पन, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अतुल आराध्ये, मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. अतुल आराध्ये, प्रा. योगेश कांगळे, सुधीर शिंदे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळेस प्रमुख पाहुणे डाॅ. रेखा पचयप्पन, प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, प्रा. योगेश कांगळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये राष्ट्रीय स्तरावरील आयोजित “आदित्य २के२४” मध्ये सोलार ई-सायकल चॅम्पियनशिप, इन्टरनॅशनल काॅनफरन्स, सोलार वर्कशॉप, सोलार प्रोजेक्ट तसेच प्रोजेक्ट काॅम्पिंटेशन, सोलार प्रोजेक्ट एक्सिबिशन आणि सोलार बिझनेस प्लॅन काॅम्पिंटेशन अशा प्रकारच्या सहा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत पंढरपूर परिसरातील अनेक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी वरदा बिडकर, ऋतुराज बडवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार डाॅ. अतुल आराध्ये यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.