प्रतिष्ठा न्यूज

पानमळेवाडीजवळ बेकायदेशीरपने गाईंची वाहतूक करणारें वाहन पकडून दोघांवर गुन्हा… गुन्ह्यात वाढीव कलम लावण्याची मागणी…

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव विटा रोडवर पानमळेवाडी गावाचे हद्दीत छोटा हत्ती गाडीतून तीन जर्सी गाईं  बेकायदेशीरपणे,कोणतीही परवानगी न घेता मायणी येथून मिरजकडे जात असताना पानमळेवाडी गावाच्या हद्दीत काही जागरूक नागरिकांना आढळून आल्या. त्यानंतर याबाबत सिद्धेश्वर लांब यांनी तात्काळ 112 नंबर डाईल करून तासगाव पोलीसांकडून मदत मिळावी यासाठी संपर्क करून सदरच्या गाई आणि वाहणात असणारे बिलाल हाजी जातकर आणि आजीद  अल्लाबक्ष शेख जातकर यांना पोलिसांच्या स्वाधीन केले.वाहनात असणाऱ्या गाई बाबत दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्या दोघांवर तासगाव पोलीस ठाण्यात सूर्यप्रकाश,चारा,पाणी,हवा अशी कोणतीही उपाय योजना न करता अनावश्यकरीत्या दोरीने जखडून,वाहणात दाटीवाटीने कोंबून क्रूरतेने वाहतूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत आता मानद प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांनी जिल्हाधिकारी सांगली,पोलीस अधिक्षक सांगली,महाराष्ट्र प्राणी कल्याण कायद सनियंत्रन समिती मंत्रालय मुंबई, गोसेवा आयोग महाराष्ट्र शासन यांना निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हंटले आहे कि,तासगाव पोलीस ठाणे मार्फत दिनाक 23 मार्च 2024 रोजी प्राण्याचा छळ प्रतिबंध अधिनियम 1960 अनुसार बेकायदेशीर रित्या जनावरांचे वाहतूक प्रकरणी 171/2024 गुन्हा नोंद केलेला आहे.23 मार्च 2024 रोजी दुपारी 15.50 वाजता MH 10 BR 5169 ही rto कडे नोंद नसलेल्या टाटा एस मालवाहू छोठ्या टेम्पोतून 3 जर्सी गाई मायणी तालुका खटाव जिल्हा सातारा येथून मिरजकडे जात असताना विना पावती,विना वाहतूक प्रमाणपत्र,कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वाहतुक करत असताना पानमळेवाडी तालुका तासगाव येथे मिळून आला काही जागरूक नागरिकांनी चौकशी केली असता सदरील गाई कत्तलीस जात आहेत असा संशय आल्याने त्यांनी डायल 112 वरती कॉल करून पोलीस मदत मागितली त्यानंतर तासगाव पोलीस ठाण्यातील पोलीस सदर ठिकाणी आल्यानंतर सदरील गाडी तासगाव पोलीस ठाण्यात रात्री 9 वाजता हजर केली.तासगाव पोलीस ठाण्यात प्राण्याच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 अंतर्गत कारवाई केली आहे.तरी,सदर गंभीर गुन्ह्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम (सुधारणा)1995 कलम 5अ1,8ब,9अ अंतर्गत वाढीव कलम लावणेबाबत विनंती करण्यात आली आहे.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.