प्रतिष्ठा न्यूज

कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराने बदनामी झाली नाही का? संचालक महादेव पाटील; तासगाव बाजार समितीतील भानगडी चव्हाट्यावर आल्याने बदनामीचा कांगावा

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : तासगाव बाजार समिती कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करताना स्वच्छ चारित्र्याचा आव आणत चुलत्या पुतण्यांनी जागा घेतल्या तेंव्हा बाजार समितीची बदनामी झाली नाही का..? असा संतप्त सवाल करत खोट्या प्रेस नोट वाटून खोटी माहिती पसरवण्यापेक्षा हिम्मत असेल तर बाजार समितीच्या सभेत पत्रकारांना प्रवेश द्या असे खुले आव्हान बाजार समितीचे संचालक तथा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव नाना पाटील यांनी बाजार समितीच्या कारभाऱ्यांना दिले. त्याचबरोबर बाजार समितीतील भानगडीवर बोलणारच बहुमताच्या जोरावर माझा आवाज दाबला जाणार नाही असा इशारा त्यांनी यावेळी दिला ते काँग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी बोलताना महादेव नाना म्हणाले बाजार समिती सभेत जे घडले ते सांगितले नाही चुकीच्या प्रेस नोट काढून बदनामी केल्याचा कांगावा केला गेला,चुकीच्या कारभारावर चार प्रश्न विचारले की तासगाव बाजार समितीचीं बदनामी कशी होते असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना विचारला.
यावेळी बोलताना महादेव नाना पाटील म्हणाले मंगळवारी तासगाव बाजार समितीची पहिली सभा पार पडली या सभेत मी सत्ताधाऱ्यांच्या काही चुकीच्या गोष्टींवर आक्षेप घेतला. माझा या आक्षेपाने सत्ताधाऱ्यांनी तासगावचे बाजार समितीचा लौकिक देशभरात आहे.आपण तिची बदनामी करू नका अशी आवई उठवली.मात्र हे करत असताना भ्रष्ट संचालकांना तात्काळ हाकला असे पत्र डीडीआर यांनी काढले होते.व त्याच भ्रष्टाचार संचालकांना सुरेश पाटलांनी तिकीट देऊन निवडून आणले त्यावेळी बाजार समितीचे बदनामी झाली नाही का? तीस वर्षे सत्तेत असणाऱ्यांनी पार्टीचे कार्यालयासाठी आठ लाख रुपये घालवले संचालकांना गेस्ट हाऊस केले मात्र शेतकऱ्यांना बसायला विश्रांती ग्रह करायचे झाले नाही. त्यामुळे बाजार समितीची इज्जत वाढवली काय इज्जत घालवली याचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी दयावे असे आव्हान महादेव पाटील यांनी दिले. चांगला कारभार करायचा असेल तर विरोधकांना बोलू दया व सभेत पत्रकारांना बसायला परवानगी देण्याची मागणी त्यांनी केली.

नियमात बसत नसल्याने आमच्या दणक्याने पहिली मीटिंग रद्द केली दुसरी मीटिंग घेतली त्या दोन्ही नोटिशींचा जावक नंबर एक व एकाच नंबरच्या दोन सभा घेत भोंगळ कारभार बाजार समितीत सुरू आहे. याची जबाबदारी कोणाची असा प्रश्न महादेव पाटील यांनी उपस्थित केला. झालेल्या बांधकामापेक्षा चार कोटी जास्त संचालक मंडळाच्या सभेच्या परवानगीने देणाऱ्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये असे ते म्हणाले.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.