प्रतिष्ठा न्यूज

घरोघरी रणरागिणी तयार व्हाव्यात सुनील बापू लाड; तासगावात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या शौर्य प्रशिक्षण शिबीराची सांगता

प्रतिष्ठा न्यूज/किरण कुंभार
तासगाव : संकटांशी दोन हात करताना मुलींना धैर्याने लढता यावे आणि आत्मसंरक्षण करता यावे हा प्रामाणिक हेतू डोळ्यासमोर ठेवून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव यांच्या वतीने फक्त मुलींसाठी मोफत शौर्य प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.शिबिर मंगळवार दिं.23 मे 30 मे यादरम्यान चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिराच्या मैदानावर देव देश धर्माच्या सेवाभावाचा आदर्श ठेवून शिबीर संपन्न झाले.23 मे रोजी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते शिबिरास सुरुवात करण्यात आली. यावेळी तासगांव शहर व परिसरातील पोलीस दलात भरती झालेल्या सर्वांचा सत्कार श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव यांच्या वतीने करण्यात आला.या शिबिरात लाठीकाठी, तलवारबाजी, चक्रिपाश,धनुर्विद्या, इंडियन मार्शल आर्ट यांचे मोफत प्रशिक्षण देण्यात आले.या शिबीरा दरम्यान प्रत्येक दिवशी भारतीय संस्कृती, इतिहास,आयुर्वेद व व्यक्तिमत्त्व विकास यावर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तासगाव यांच्या वतीने हे शिबिर संपुर्णत: मोफत ठेवण्यात आले होते.या संपुर्ण शिबिरात १६० हुन अधिक मुलींनी सहभाग घेतला होता.३० तारखेला सायंकाळीं या शिबिराचा समारोप झाला.समारोप प्रसंगी सहभागी शिबिरार्थं मुलींची शौर्य प्रात्यक्षिक सादर केली.शिबिरात सहभागी झालेल्या सर्व मुलींना प्रतिष्ठानचे वतीने प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी घरोघरी रणरागिणी तयार व्हाव्यात, केलेला हा अट्टाहास आहे ज्या सक्षम,व अष्ठावधान जागृत असल्या पाहिजेत असे आवाहन समारोप प्रसंगी बोलताना सुनिल बापू लाड यांनी केले. समारोप प्रसंगी प्रसादाचे आयोजन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.