प्रतिष्ठा न्यूज
राजकीय

३७० कलम हटवल्याचा जास्त लाभ मुस्लिम समाजाला : सौ. रिदा रशीद ; संजयकाकांच्या प्रचार्थ  सौ.ज्योतीताई पाटील, सौ.मंजरीताई गाडगीळ यांच्यासह सांगलीत बैठका

प्रतिष्ठा न्यूज
सांगली प्रतिनिधी : काश्मिरात मुस्लिमांची दयनीय अवस्था होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ३७०कलम हटवल्याने जास्त लाभ मुस्लिम समाजाला झाला असून तिथे स्वर्ग अवतरला आहे. असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्यांक मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस सौ. रिदा रशीद यांनी केले.
सांगली लोकसभेचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार मा.संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ  सौ. रीदा रशीद, सौ.ज्योतीताई  संजयकाका पाटील, सौ.मंजरीताई गाडगीळ यांनी विविध प्रभागात जाऊन महिलांशी थेट संवाद साधला. यावेळी सौ. रशीद बोलत होत्या. प्रदेश लोकसभा संयोजक अशरफ वांकर, हज कमिटी संचालक नसीमा शेख,प्रदेश सचिव अनारकली कुरणे,जिल्हा अध्यक्ष इमरान शेख,उपाध्यक्ष अतुल माने, मंडल अध्यक्ष रवींद्र ढगे,बंडू सरगर, उपाध्यक्ष समीर मोमीन,लियाकत शेख,सलीम शेख,उद्योजग अब्बास नायानी, अब्बास मेघानी,प्रदेश सदस्य रियाझ वंटमुरे, महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष कनीजा सोलकर, नसरीन शेख सामाजिक कार्यकर्ते दीपक चव्हाण,आदी उपस्थित होते.
सौ. रशीद म्हणाल्या, जम्मू आणि काश्मीरमधील ३७० कलम हटवण्यापूर्वी तेथील मुस्लिमांची अवस्था फार वाईट होती. पृथ्वीवरचा स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरचा  नरक झाला होता. मुस्लिमांचे जगणे मुश्किल झाले होते. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७०कलम हटवल्यानंतर आता तेथे स्वर्ग अवतरला आहे. मुस्लिम समाजासाठी हि बाब अत्यंत लाभदायक ठरली आ हे. पर्यटन वाढल्यामुळे  रोजगार तिथे रोजगाराच्या, व्यवसायाच्या नव्या संधी  उपलब्धझाल्या आहेत. . छोटे -मोठे व्यवसाय तेथे सुरू झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या धाडसी क्रांतिकारी निर्णयामुळे फार मोठा बदल झाला आहे. .पंतप्रधानांनी राबवलेल्या कौशल्य विकास योजनेचाही मुस्लिम युवकांना फायदा झाला आहे.  मुस्लिम युवकांना विदेशात तांत्रिक स्वरूपाच्या नोकरीसाठी जाणे सुलभ झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तीन तलाक बंदीचा (ट्रिपल तलाक) कायदा केल्यामुळे  मुस्लिम महिलांचे जीवन सुरक्षित बनले आहे. पंतप्रधान मोदी यांचा हा निर्णय सामाजिक क्रांती घडवणारा ठरला आहे,

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.