प्रतिष्ठा न्यूज

जिल्ह्याच्या विकासासाठी विशालदादांना संसदेत पाठवा पुजा पाटील : आटपाटी परिसरातील बैठकांना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
सांगली : सांगली जिल्ह्यातील जनता नेहमीच वसंतदादा घराण्याच्या पाठिशी राहिली आहे. अडचणीच्या काळात वसंतदादा घराण्याने जनतेला मदतीचा हात दिला आहे. गेल्या दहा वर्षात जिल्ह्याच्या विकासाची गती रोडावली आहे. भाजप  व विद्यमान खासदारांनी जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवण्याचे पाप केले आहे. विशालदादांना संसदेत पाठवून जिल्ह्याचे प्रश्न मांडण्याची संधी द्यावी, असे आवाहन पुजा विशालदादा पाटील यांनी केले.
सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पुजा विशालदादा पाटील यांनी आटपाडी शहर आणि परिसरात महिलांच्या बैठका घेतल्या. या बैठकांना महिलांनी मोठा प्रतिसाद दिला. यंदा विशालदादांना आटपाडी परिसरातून मताधिक्य देण्याचा निर्धारही महिलांनी बोलून दाखविला. पुजा पाटील म्हणाल्या, विशालदादांना उमेदवारी देण्यापासून चिन्हापर्यंत त्रास देण्यात आला. वसंतदादा घराणे आणि विशालदादांवरील अन्यायामुळे जनतेतून उठाव झाला आहे. विशालदादा हे जनतेचे उमेदवार आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन विशालदादांकडे आहे. त्यासाठी त्यांना संसदेत पाठवा, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी डी. एम. पाटील, तुषार पवार, आसिफ खाटीक, नाथा लांडगे, फारुक इनामदार, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, खलील मुलाणी, खांजोडवाडी येथील बापू सूर्यवंशी, बोंबेवाडी येथील दिनकर कारंजे, देशमुखवाडी येथील गोरख बाबर, गीतांजली पाटील आदि उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.