प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांना पुन्हा खासदार करण्याचा जतच्या जनतेचा निर्धार ; विकास कामांमुळे प्रचार दौऱ्याला प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा खासदार करण्याचा निर्धार जत तालुक्यातील जनतेने ठिकठिकाणी बोलून दाखवला.
संजयकाका पाटील यांनी जत तालुक्यातील लकडेवाडी, जाडरबोबलाद, सोन्याळ, उटगी यासह विविध गावांमध्ये प्रचार दौरा केला. प्रत्येक गावात जोरदार स्वागत करण्यात आले.
संजयकाका पाटील यांनी आतापर्यंत केलेल्या जत तालुक्यातील विकास कामांची माहिती सांगितली. त्यावर नागरिकांना जत तालुक्यात प्रचंड प्रमाणात विकास कामे केल्यामुळे आम्ही तुमचे उत्साहात स्वागत करत असून पुन्हा एकदा तुम्हालाच आम्ही खासदार करणार आहोत असा निर्धार बोलून दाखवीला.
गावोगावी होणारी नागरिकांची गर्दी पाहून खासदार संजयकाका पाटील यांना विजयाची खात्री पटली.
संजयकाका पाटील म्हणाले, जतच्या जनतेने दाखविलेला विश्वास आणि दिलेलं प्रेम मी कधीही विसरू शकत नाही. ज्यांनी मला खासदार केलं त्यांचे ऋण फेडण्यासाठी मी अहोरात्र कष्ट करत आहे. आता पुन्हा एकदा खासदार करण्याचा तुमचा निर्धार पाहून मला हत्तीचं बळ आलं आहे. त्यामुळे यापुढच्या काळात विकासाचा वेग वाढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती करण्यासाठी आपण मला साथ देणार आहात. सर्वाधिक मताधिक्य हे जत तालुक्याचे असेल. असा मला विश्वास आहे.
या दौऱ्यात भारतीय जनता पार्टीचे नेते तमनगौंडा रवि पाटील, डॉ. रविंद्र आरळी, प्रकाश जमदाडे, विठ्ठल निकम, सुनील पवार, संजय कांबळे, अंकुश होवाळे, राजू पुजारी, सरदार पाटील, विजय बगली, म्हाळाप्पा पुजारी, तानाजी पाटील, रवि चिखलकट्टे,
संजूअण्णा तेली, साहिल कुलकर्णी, मनतेश पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.