प्रतिष्ठा न्यूज

जतमधील ३१ माजी नगरसेवकांचा विशालदादा पाटील यांना पाठिंबा ; काँग्रेस ,राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजप नगरसेवकांचा समावेश

प्रतिष्ठा न्यूज
जत प्रतिनिधी : जतमधील आज काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप ह्या 31 माजी नगरसेवकांनी संयुक्तरीता पत्रकार परिषद घेत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला त्यामुळे लोकसभा निवडणुकीत विशालदादा पाटील यांची ताकद वाढली आहे.
या संयुक्त घेतल्या पत्रकार बैठकीला नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर, माजी नगरसेवक निलेश बामणे, परशुराम मोरे, वनिता साळे, निलाबाई कोळी,सौ गायत्रीदेवी शिंदे, सौमंदाकिनी बेळुकीं, महादेव कोळी, गौतम ऐवाळे, श्रीमती नंदा कांबळे, श्रीदेवी सगरे,सौ अश्विनी माळी, इमरान गवंडी,सौ माया साळे, सौ संगीता माळी, सौ जयश्री शिंदे, स्वप्निल शिंदे,सौ बाळाबाई मळगे, प्रकाश माने ,सौ भारती जाधव ,सौशारदा कुंभार, गिरमल तात्या कांबळे, जयश्री मोटे, हनुमंत कोळी, नामदेव काळे, इरण्णा निडोणी ,मुन्ना पखाली, मिथुन भिसे, सुजय शिंदे, साहेबराव कोळी ,माजी सरपंच नसीर मुल्ला ,भाजपचे शहर अध्यक्ष अणा भिसे ,प्रवीण जाधव, आप्पा शिंदे ,आनंद कांबळे ,संतोष मोटे,दीपक शिंदे ,सदाम अत्तार, अशोक कोळी, पांडुरंग मळगे, विनय बेळुंखी, प्रकाश मोटे, संजय माने पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ शुभांगी बन्नेनवर म्हणाल्या की दहा वर्षात खासदार संजय काका पाटील यानी जत शहराला निधी दिला नाही. त्यामुळे आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला आहे. तर माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले की आमदार विक्रमसिंह सावंत यांनी जत शहरासाठी निधी आणला मात्र खासदार संजय काका पाटील यांनी शुद्धिपत्रक करून तोच निधी दिला दहा वर्षात जत शहराला त्यांनी निधी दिला नाही. अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना आमचा सर्व नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचे माजी नगरसेवक निलेश बामणे म्हणाले.
तर भाजपचे शहर अध्यक्ष अण्णा भिसे म्हणाले की आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांनी बंड पुकारला असून त्यांचा आदेश म्हणून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देत आहोत. तर माजी नगरसेवक परशुराम मोरे म्हणाले की जिल्ह्याचा विकास फक्त विशाल पाटील करू शकतात त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. तर माजी नगरसेवक गौतम ऐवाळे म्हणाले की आमचे नेते माजी आमदार विलासराव जगताप यांच्या सांगण्यावरून आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला आहे. माजी नगरसेक इरण्णा निडोणी म्हणाले की अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या विजयासाठी आम्ही 31 माजी नगरसेवक त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. त्यांना जत शहरात मोठ्या मताधिक्य देऊ असे इरण्णा निडोणी म्हणाले. तर पापा कुंभार म्हणाले की जत शहरात भीषण पाण्याची अवस्था असून. जर शहराला पाणीपुरवठा करणारे 78 कोटी नळ पाणीपुरवठा तांत्रिक बाबीत अडकली आहे. मात्र खासदार संजय काका पाटील यांनी यासाठी कोणताही प्रयत्न केले नाही .त्यासाठी आम्ही अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतला असल्याचे युवा नेते पापआ कुंभार म्हणाले. युवा नेते संतोष मोठे म्हणाले की आम्ही सर्व 31 माजी नगरसेवकांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा जोमाने प्रचार करू असे युवा नेते संतोष मोठे म्हणाले

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.