प्रतिष्ठा न्यूज

विश्वजित कदमांनी घेतली उध्दव ठाकरेंची भेट; विशाल दादांच्या बंडखोरीबाबत चर्चेला नवे वळण

प्रतिष्ठा न्यूज
कोल्हापूर प्रतिनिधी : लोकसभा निवडणूकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला तरी महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेच्या जागेवरून सुरू असलेला वाद अजूनही कायम आहे. या जागेवर शिवसेना ठाकरे गटाकडून दावा करण्यात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वीच पक्षात प्रवेश केलेल्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही पाच वर्षे लोकसभेची तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांना फटका बसला. त्यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी माघारी न घेता सांगली लोकसभा निवडणूक बंडखोरी केली. अपक्ष म्हणून रिंगणात उतरले आहेत.

दुसरीकडे काँग्रेसकडून विशाल पाटील यांच्या बंडखोरीवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. याबाबतचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला. त्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते आमदार विश्वजीत कदम सांगलीतून कोल्हापूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी पोहोचले या भेटीमध्ये काय चर्चा झाली असे विचारण्यात आले असता आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीबद्दल बोलण्यास स्पष्ट नकार दिला. म्हणाले की कोल्हापूर मतदारसंघाच्या अनुषंगाने आमची चर्चा झाली. सांगली लोकसभेबाबत कोणताही चर्चा झाली नाही. विश्वजित कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो होतो. कोल्हापूरमध्ये आमच्या संस्था आहेत आणि व्यक्तिगतरित्या शाहू महाराज कुटुंबाबद्दल कदम कुटुंबाला आदर आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये येऊन कोल्हापूरात आलो होतो.

दरम्यान सांगलीत विशालदादा पाटील यांना बंडखोरी करण्याबाबत राज्यातील एका वरिष्ठ नेत्याचा दबाव आहे. अशी माहिती डॉ. विश्वजीत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना दिली असल्याची चर्चा आहे. तसेच जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या उमेदवारी विरोधात भूमिका घेत असल्याबद्दल कदम यांनी खंत व्यक्त केल्याची ही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.