प्रतिष्ठा न्यूज

शिवसेनेचे व महाविकास आघाडीचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार पै. चंद्रहार (दादा) पाटील यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पदयात्रेस नागरिकांतून उस्फूर्त प्रतिसाद

प्रतिष्ठा न्यूज/अनिल शिंदे
 सावळज : सावळज: ता. तासगाव  येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचे सांगली लोकसभा  मतदार संघाचे अधिकृत उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ महिलांनी पदयात्रा काढत घरोघरी जाऊन साधला संवाद साधला त्यास सावळज येथील नागरिकांतून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी महिलांनी घरोघरी जाऊन हळदी कुंकू कार्यक्रम घेत प्रचाराची सुरवात  धुमधडाक्यात केली.
 पै. चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून आपल्या सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पै.चंद्रहार पाटील यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले.
यावेळी पै. चंद्रहार पाटील यांच्या पत्नी दिव्या वहिनी पाटील,तसेच भगिनी प्राजक्ता ताई,शिवसेनेचे तासगाव तालुका प्रमुख प्रदीप काका पाटील, तासगाव शहर प्रमुख विशाल भैया शिंदे, उप तालुका प्रमुख संदीप मस्के, माजी तालुका प्रमुख अनिल शिंदे, पुरण मलमे, सुनील मगदूम, पै. गजानन पाटील, दादासाहेब आवळे, दयानंद कांबळे, संजय कलाल, बाळासाहेब यादव,श्रीकांत शिंदे, महिला वर्ग, शिवसैनिक, व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.