प्रतिष्ठा न्यूज

संजयकाकांची प्रचंड मतांनी खासदारकीची हॅट्रिक होणार : युवानेत्या वैष्णवीदिदी पाटील; विटा परिसरात प्रचार दौरा

प्रतिष्ठा न्यूज
विटा प्रतिनिधी : खानापूर आटपाडीमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे केली असून संजयकाका पाटील यांची प्रचंड मताने खासदारकीची हॅट्रिक होणार आहे, असा विश्वास खासदार कन्या युवा नेत्या वैष्णवीदीदी संजयकाका पाटील यांनी व्यक्त केला.
सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा माहितीचे उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आज खानापूर- आटपाडी विधानसभा मतदारसंघात विटा शहर व लेंगरे,भूड, माधळमुठी, देवीखिंडी, वासुंबे या ग्रामीण भागात सौ. ज्योतीताई संजयकाका पाटील व वैष्णवीदीदी पाटील यांनी नागरिकांच्या भेटी व संपर्क दौरा केला.
या दौऱ्यात वैष्णवीदीदी बोलत होत्या. आपकी बार ४०० पार संजयकाका खासदार असा नारा देत खानापूर आटपाडी परिसरात खासदारांनी केलेल्या कामांची महिती वैष्णवीदीदी यांनी दिली.
विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्रतिभाताई पाटील, जयश्रीताई पाटील, प्रणिती पाटील, भाजप महिला मोर्चाच्या शुभांगी सुर्वे, विटा शहराध्यक्ष लता मेटकरी, लेंगरे च्या माजी सरपंच शिलनताई शिंदे, भूड उपसरपंच सुप्रिया मोरे, प्रतिभा चोथे, मनीषा शितोळे, सरिता चव्हाण, सलोनी चव्हाण, विटा शहर व ग्रामीण परिसरातील महिला बहुसंख्येने सहभागी झाल्या होत्या.

मुख्य संपादक : तानाजीराजे जाधव 8237992022

SHARE
Show More

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.